शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्येवर ‘इरमा’चा डोस

By admin | Updated: April 28, 2017 06:02 IST

कायदा हा कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने राहिला नसल्याने, हा व्यवसाय नेहमीच आतबट्ट्याचा ठरला आहे. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव

पुणे : कायदा हा कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने राहिला नसल्याने, हा व्यवसाय नेहमीच आतबट्ट्याचा ठरला आहे. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, सावकारीसह संपूर्ण कर्जमुक्ती आणि सर्व प्रकारच्या संकटातून संरक्षण देणारा इन्कम रिस्क मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (इरमा) लागू केल्यास मी गॅरंटीने सांगतो राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबतील, असा विश्वास कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. मुळीक यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांची ग्रंथतुला करून आणि शिंदेशाही पगडी, ७५ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला. त्यांची पत्नी शालिनी यांचाही साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. या प्रसंगी त्यांनी शेतीच्या स्थितीवर आणि सरकारी धोरणांवर परखड टिप्पणी केली. पालकमंत्री गिरीश बापट, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, आमदार जगदीश मुळीक, उल्हास पाटील, पाशा पटेल, मोहन जोशी, उल्हास पवार, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, उत्तमराव शिंदे-सरकार या वेळी उपस्थित होते. डॉ. मुळीक म्हणाले, ‘‘सरकारने सावकारीसह संपूर्ण कर्जमुक्ती केली पाहिजे. तशी घोषणा करण्याचे धाडस सरकारने दाखविले पाहिजे. शेतमालाला भाव नाही आणि शेतीला धोरणाप्रमाणे कर्ज वितरण नाही, असे दुष्टचक्र आहे. कायद्यानेच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला असता, तर आज तुरीचा प्रश्न उपस्थित राहिला नसता.’’ शेतकऱ्यांना नैसर्गिक, कृत्रिम अशा सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण दिल्यास कोणीही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यासाठी मी इन्कम रिस्क मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (इरमा) लागू करण्याचा आग्रह सरकारकडे धरीत आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)