शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने घेतली आयपीएलची विकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:18 IST

वास्तविक ही चर्चा केवळ भावनिक आहे. कोरोना विषाणूमुळे अडखळलेल्या अर्थचक्राला मंद का होईना, पण वेग देण्याचे काम आयपीएल क्रिकेटमुळे ...

वास्तविक ही चर्चा केवळ भावनिक आहे. कोरोना विषाणूमुळे अडखळलेल्या अर्थचक्राला मंद का होईना, पण वेग देण्याचे काम आयपीएल क्रिकेटमुळे होत होते. रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना सामने खेळले जात असल्याने कोरोना साथ पसरण्याचा धोका संपला होता. दररोज संध्याकाळी रंगणाऱ्या थराराचा आनंद लुटण्यासाठी का होईना लाखो क्रिकेटप्रेमी घरी थांबू लागले हाही एक अप्रत्यक्ष फायदाच होता. आयपीएल खेळणाऱ्या प्रत्येक संघाला 'बायो-बबल'चे नियम अनिवार्य केल्याने तर चार रोजगार वाढलेच, पण कमी झाले नाहीत. एकूणात काय तर आयपीएल क्रिकेटमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे काही कुठे दिसले नाही. आठ देशांमधले खेळाडू एकत्र करत, 'बायो-बबल'चे नियम पाळत सामने खेळवणे ही कोरोना संकटकाळात फार कठीण कामगिरी होती. खेळाडूंच्या मानसिकतेचीही कसोटी यात पाहिली गेली. नातेवाईक, मित्रपरिवाराला कोरोनाचा धोका असताना क्रिकेटच्या मैदानावर उतरणारा प्रत्येक खेळाडू सर्वोच्च कामगिरीसाठी घाम गाळत होता. दुसऱ्या बाजूला कोणतेही व्यवहार्य, तर्कशुद्ध कारण न देता आयपीएलच्या नावाने खडे फोडले जात होते. तरीही बीसीसीआयने नेटाने स्पर्धा चालू ठेवली. फक्त क्रिकेटच कशाला पुण्यासारख्या शहरात आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धाही कोरोनाच्या काळातच खेळल्या गेल्या. पण, क्रिकेटएवढे ग्लॅमर त्याला नसल्याने बहुधा त्यावर कोणी टीका केली नाही. शेवटी कोरोनानेच आयपीएल थांबवली. खेळाडूंनाच कोरोनाने गाठल्याने बीसीसीआय पुढचे पर्याय संपले.

आयपीएलसारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या स्पर्धेचे नियोजन एका रात्रीत होत नसते. हे नियोजन झाले तेव्हा केंद्रातले, राज्यातले सरकार आणि बव्हंशी जनतादेखील कोरोनाचे संकट संपत आल्याच्या भ्रमात होती. याला बीसीसीआयदेखील अपवाद नव्हती, तरी बीसीसीआयने सहाच शहरांत सामने खेळवण्याचा सुज्ञपणा दाखवला. स्पर्धेतील संघांसाठी काटेकोर नियमावली केली. चेन्नई, मुंबईत पहिल्या टप्प्यातले सामने झाले. सध्या दुसऱ्या टप्प्यातले सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळले जात होते. तिसऱ्या टप्प्यातले सामने येत्या आठवड्यात बंगळुरू आणि कोलकात्यात होणार होते. रंगतदार होत गेलेली आयपीएल अंतिम टप्प्याकडे जात असतानाच कोरोनाने 'बायो-बबल' फोडल्याचे स्पष्ट झाले. यात फार काही अघटीत घडले असे नाही. कोरोना संसर्गाची तीव्रता लक्षात घेता हे कधी ना कधी घडू शकते, अशी धास्ती होती. नेमके तेच घडले. कोरोनाने आपल्यातल्या अनेकांना अकाली हिरावून नेले. कोणाचाही मृत्यू हा दुःखद आणि नकोसाच असतो. क्रिकेटप्रेमींना, खेळाडूंना, आयोजकांची भावना या बाबतीत वेगळी असेल असे मानणे त्यांच्यावर अन्याय करणारी ठरेल. आसपास लोक आजारी पडत आहेत. उद्योगधंदे बंद पडल्याने, पगार कमी झाल्याने, नोकऱ्यांवर टांगती तलवार आल्याने आर्थिक-सामाजिक विवंचनेत अनेकजण आहेत. त्यातच कोरोना कधी कोणाला, गाठेल याचा नेम नसल्याचा ताण वेगळाच. पण म्हणून कोणी जगणे थांबवते काय़? संवदेनशीलता कायम ठेवून आहे ते जगणे आनंदी करत पुढे चालण्याचे तारतम्य दाखवावे लागते. क्रिकेट काय किंवा अन्य कला, क्रीडाप्रकार, वाचनासारखे छंद काय, कोरोनाकाळात यातून मिळेल तितके बळ घ्यावे. सकारात्मक ऊर्जा घ्यावी. 'मरे येक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे,' हे शाश्वत सत्य तर आहेच की. उन्माद टाळून, आनंद वाटत राहिले तरच सध्याचे दिवस सोपे होतील. क्रिकेटच्या माध्यमातून हे घडत होते. ते थांबले.