शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भोसलेंच्या बंडखोरीची गंभीर दखल

By admin | Updated: February 5, 2017 03:48 IST

आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी केलेल्या बंडखोरीची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. येत्या दोन दिवसांत अजित पवार याबाबत

पुणे : ‘आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी केलेल्या बंडखोरीची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. येत्या दोन दिवसांत अजित पवार याबाबत जाहीरपणे बोलतील,’ असे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले. कारवाईचा निर्णयही तेच घेतील, असे त्या म्हणाल्या.भोसले यांना पक्षाने दोन वेळा विधान परिषदेची उमेदवारी दिली. महापालिकेतही अनेक पदे दिली. या वेळी प्रभागात कार्यकर्त्याला उमेदवारी देऊ, तुम्ही थांबा असे अजित पवार यांनी सांगितले होते, मात्र त्यांनी ऐकले नाही. उमेदवारी मिळाली नाही हे समजल्यावर लगेचच पक्षाशी बंडखोरी केली. कार्यकर्त्यांमध्ये राग आहे, असे चव्हाण म्हणाल्या.पक्षाने अन्य प्रभागांमध्ये नातेवाईकांमध्ये उमेदवारी दिली आहे, असे निदर्शनास आणले असता चव्हाण म्हणाल्या, ‘‘काही वेळा असे निर्णय घ्यावे लागतात. पण उमेदवारी मिळाली नाही, म्हणून कोणी पक्षाच्या विरोधात जात नाही. अनेक कार्यकर्ते असे आहेत, की त्यांनी उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाचे निष्ठापूर्वक काम करणार असल्याचे भेट घेऊन सांगितले. योग्य भूमिका असेल तर पक्ष लक्षात ठेवतो. चुकीची भूमिका घेतली तर त्याचा धडा कधी ना कधी तरी मिळतोच.’’निवडणूक अधिकारी पक्षपातीपणाने काम करीत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्नराज्य सरकारने निवडणूक भाजपाच्या फायद्याची कशी होईल, त्यासाठी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्यापासून अनेक बदल निवडणूक प्रक्रियेत केले आहेत. निरक्षर व गरिबातील गरीब व्यक्तीलासुद्धा निवडणूक लढविता यावी, असे घटनेतच स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, मात्र आॅनलाईन अर्ज सक्तीचा करून त्याला हरताळ फासण्यात आला, अशी टीका चव्हाण यांनी केली. ४राज्य सरकारने विकास आराखडा इंग्रजीत जाहीर केला. राजकीय पक्ष निवडणुकीत गुंतलेले असतील, त्यामुळे भूखंडांवरील आरक्षण उठवण्यासह सर्व गडबडी गुप्त राहतील, अशा हेतूनेच राज्य सरकारने ही खेळी केली असल्याचा आरोप वंदना चव्हाण यांनी केला. आराखडा मराठीत जाहीर करावा व हरकतीसाठी निवडणुकीनंतर महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची क्लिपिंग्ज नाकारली गेली. हे सगळे चुकीचे व राज्य सरकारच्या आदेशाने चालले आहे, राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.