शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नगर रस्ता दळणवळणासाठी व्यत्यय

By admin | Updated: October 14, 2015 03:26 IST

औद्योगिकीकरण तसेच दळणवळणाची सुव्यवस्था विकासाच्या धमण्या समजल्या जातात. तालुक्यात औद्योगिकीकरणाचे जाळे विणले गेले.

प्रवीण गायकवाड, शिरूरऔद्योगिकीकरण तसेच दळणवळणाची सुव्यवस्था विकासाच्या धमण्या समजल्या जातात. तालुक्यात औद्योगिकीकरणाचे जाळे विणले गेले. मात्र, या वाढत्या औद्योगिकीकरणासाठी दळणवळणाचे साधन असलेला पुणे-नगर रस्ता दळणवळणासाठी व्यत्यय बनू लागला आहे. याचा परिणाम नवीन उद्योग तालुक्यात येण्यास तयार नाहीत, तर आहे ते उद्योग स्थलांतराच्या विचारात असल्याचे चित्र आहे. २००० साली रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीची सुरुवात करण्यात आली. पंचतारांकित दर्जा असलेल्या या वसाहतीत मोठ्या प्रमाणावर बहुराष्ट्रीय कारखान्यांचे जाळे विखुरले आहे. या वसाहतीमुळे शासनाने दळणवळण सुरळीत होण्याकरिता शिरूर-पुणे या रस्त्याचे चौपदरीकरणाचे कामही केले. हा रस्ता तयार करताना शासनाने अनेक त्रुटी ठेवल्या, असे आता जाणवते. विदर्भ-मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या या रस्त्यावर दिवसागणिक वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन या रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रस्ता तयार करणे गरजेचे होते. तसेच या रस्त्यावर असणाऱ्या गावांच्या ठिकाणी उड्डाणपुलाची सुविधा निर्माण करणेही आवश्यक होते. मात्र, केवळ चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. अनेक ठिकाणी रस्त्याच्या रुंदीचे निकष पाळण्यात आले नाही. २००५ ते २०१४ पर्यंत या रस्त्यावर पेरणे फाटा (२०१० पर्यंत रांजणगाव येथेही) येथे टोलनाका होता. या नाक्यावरील ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागायच्या, हाही एक मोठा अडथळा होता. संध्याकाळी घरीही वेळेवर पोहोचता येत नाही. यामुळे हा अधिकारीवर्ग तसेच इतर कर्मचारीही त्रासलेले आहे. असहाय असल्याप्रमाणे ते हे सर्व सहन करीत आहेत.