शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

खासगी शाळांकडून मनमानी शुल्क वसुली

By admin | Updated: May 26, 2017 05:44 IST

पूर्व हवेली परिसरात इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली भरमसाट शुल्क आकारणी करून पालकांची आर्थिक लूट केली जाते़

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव मूळ : पूर्व हवेली परिसरात इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली भरमसाट शुल्क आकारणी करून पालकांची आर्थिक लूट केली जाते़ संस्थाचालकांकडून शुल्क निर्धारणाचे नियम धाब्यावर बसवून पालक व शिक्षक संघाच्या सभा कागदोपत्री घेतल्या जात आहेत. संस्थाचालकांच्या मनमानी कारभारामुळे पालक चांगलेच कोंडीत सापडले आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणत्याही शाळेला प्रवेशासाठी देणगी (डोनेशन) स्वीकारता येत नाही. शहरासह जिल्ह्यातील सर्व खासगी शाळांना हा कायदा लागू आहे. मात्र काही शाळांमध्ये याला तिलांजली देऊन विविध शुल्कांच्या नावाखाली पालकांची लूट सुरू आहे. विशेष म्हणजे, अनुदानित शाळांमध्येही हा प्रकार सुरू आहे. विरोध केल्यास प्रवेश मिळणार नाही, या धास्तीमुळे कोणीही पालक तक्रार करण्यास धजावत नाहीत. पुढील शैक्षणिक सत्र १५ जूनपासून सुरू होत आहे. परीक्षांचा हंगाम आटोपत आला असताना पहिलीच्या प्रवेशासाठी लगीनघाई सुरू झाली आहे. अनेक पालकांचा कल खासगी शाळांकडे आहे. मात्र काही संस्थांमध्ये छुप्या मार्गाने डोनेशन मागितले जाते. खासगी अनुदानित शाळांना शासकीय अनुदान असेल, तर सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश द्यावेत, असे शासनाचे निर्देश आहेत. पण, संस्थाचालक शाळेच्या दर्जाची जाहिरातबाजी करून विविध शुल्कांच्या नावाखाली पालकांची लूट करत असल्याची तक्रार काही पालक करत आहेत. याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज पालकांनी व्यक्त केली आहे.