पुणो : एकाचा जीव वाचविताना चारचाकीला झालेल्या अपघातानंतर दुरुस्तीसाठी झालेल्या खर्चाचा विमा नाकारणा:या कंपनीला ग्राहक मंचाने फटकारले. विम्याची कमी रक्कम देऊन विमाधारकाची बोळवण करणा:या रॉयल सुंदरम अलायन्स इन्शुरन्स कंपनीला ग्राहक न्यायालयाने सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्ट केले. सात हजार 66 रुपये देण्याचा आदेश दिला.
ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य क्षितिजा कुलकर्णी व मोहन पाटणकर यांनी हा आदेश दिला. या प्रकरणी चिखली येथील रहिवासी असणा:या हिराबाई माणिक लोखंडे यांनी तक्रार दाखल केली होती. लोखंडे यांनी त्यांच्या नावावर असलेली मारुती अल्टो ही चारचाकी गाडी घेतली होती. या वाहनाचा विमा त्यांनी रॉयल सुंदरम अलायन्स इन्शुरन्स, लॉ कॉलेज रस्ता येथून घेतला होता. घटनेच्या दिवशी जालिंदर मारुती जाधव हे लोखंडे यांची चारचाकी घेऊन चिखलीहून जाधववाडीकडे जात होते. त्या वेळी अचानक एक गृहस्थ वाहनासमोर आल्याने त्याला वाचविण्यासाठी जाधव यांनी वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतले. त्या वेळी वाहनाच्या खाली काहीतरी आवाज आला आणि काही अंतरावर जाऊन वाहन बंद पडले. वाहन सुरू झाले नाही त्या वेळी त्यांनी क्रेनच्या मदतीने नजीकच्या सव्र्हिस सेंटरमध्ये वाहन नेऊन दुरूस्ती केली. दुरुस्तीसाठी 15 ते 2क् हजार खर्च येणार असल्याचे मेकॅनिकने सांगितले. त्यामुळे लोखंडे यांनी अपघाताचा कलेम कंपनीकडे मागितला. मात्र, विमा कंपनीने विमा नाकारला. लोखंडे यांनी कोणत्याही नियमाचा भंग केलेला नसतानाही त्यांचा क्लेम नाकारल्याने ग्राहक मंचाकडे दुरुस्ती खर्च, मानसिक त्रसापोटी 5 हजार रुपये मिळावे, असा अर्ज केला. (प्रतिनिधी)
नुकसान भरपाईमध्ये ऑईल पॅनकडे दुर्लक्ष
4कंपनीच्या सव्र्हेक्षकाने वाहनाची तपासणी करून नुकसानभरपाई म्हणून 2क्क्3 रूपये मान्य केलेले होते. मात्र, वाहनाच्या ऑईल पॅनचे झालेले नुकसान विचारात घेतले नाही.
4आईल गळती भरपाईचा विचार केलेला नाही. या गळतीचे रूपये 1क्63 व क्रेनचे भाडे 1 हजार रूपये देण्यास कंपनी बांधील आहे. मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई म्हणून 3 हजार रूपये, असा एकूण 7 हजार 66 रूपये कंपनीने तक्रारदारांना द्यावे, असा मंचाने आदेश दिला. सहा आठवडय़ांच्या आत रक्कम न दिल्यास 1 मार्च 2क्12 पासून दसादशे 9 टक्के व्याजाने रक्कम मिळवू शकतात, असेही आदेशात नमूद केले.