विमा योजनेसाठी दोन महिन्यांपूर्वी मागविलेल्या प्रस्तावानुसार एकच प्रस्ताव आला. त्यामुळे प्रशासनाने हा विमा कसा असावा, कमी खर्च कसा होईल याविषयी सल्ला देण्यासाठी विमा सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या नागरिकांना शहरी गरीब योजने अंतर्गत एक ते दोन लाखांपर्यंतचे उपचार दिले जातात. त्यासाठी पालिकेने शहरातील ७४ रूग्णालयांशी करार केलेला आहे. या रूग्णांवर वर्षाला ५० ते ७० कोटी रुपये खर्च होत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका नागरिकांचा उतरविणार विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST