शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

...हा संस्था बंद पाडण्याचा डाव

By admin | Updated: July 25, 2015 04:14 IST

एफटीआयआयमधील ‘महाभारता’ला आता वेगळेच वळण लागले आहे. ज्या संस्थेपासून राजकीय शक्ती दूर ठेवण्याच्या बाता मारल्या जात होत्या,

पुणे : एफटीआयआयमधील ‘महाभारता’ला आता वेगळेच वळण लागले आहे. ज्या संस्थेपासून राजकीय शक्ती दूर ठेवण्याच्या बाता मारल्या जात होत्या, त्या संस्थेमध्येच आता विद्यार्थ्यांच्या विरोधातले राजकारण सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांवर दाखल झालेला गुन्हा, संस्थेमध्ये मुले अमली पदार्थ घेत असल्याने पोलिसांची त्यांच्यावर असलेली करडी नजर आणि यातच आता पतितपावन संघटनेने या मुलांना अटक करण्यासाठी काढलेला मोर्चा या गोष्टींमधून विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचे प्रकार आता सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन किती काळ तग धरणार हाच कळीचा मुद्दा आहे. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलनाचे ४२ दिवस सरले तरी केंद्र शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. मात्र हे आंदोलन संपवण्याचे प्रकार या ना त्या मार्गाने सुरू झाले आहेत. या साऱ्या गोष्टी संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणाऱ्या आहेत, असे सांगत हा विरोधी विचारांच्या व्यक्तींचा संस्था बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच विरोधक आंदोलनाला मूळ मुद्द्यांपासून हटवून वेगळे वळण लावत असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, चांदेकर यांनी संचालक मंडळातील सदस्य राहुल सोलापूरकर व अनघा घैसास यांच्या मदतीने दोन दिवसांनंतर दाखल केलेला गुन्हा कोणाच्या पाठिंब्यामुळे आहे हे वेगळे सांगायला नको. मात्र पोलिसांनीही संस्थेत अमली पदार्थ आणले जातात, असे सांगून विद्यार्थ्यांची बाजू कमकुवत केली आहे. हे घडणारे सर्व प्रकार आंदोलन दडपण्यासाठी होत असल्याने विद्यार्थ्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यामागे कोण शक्ती कार्य करीत आहे, याचा शोध लागावा, यासाठी या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)