शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाशेहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईतांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:08 IST

पुणे : कोथरूडमधील सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये दरोडा टाकून फरार होत असताना पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चोरट्यांना न्यायालयाने ...

पुणे : कोथरूडमधील सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये दरोडा टाकून फरार होत असताना पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चोरट्यांना न्यायालयाने १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी फिल्मी टाईल पाठलाग करून दोघांना अटक केली होती. या सराईत चोरट्यांवर सव्वाशेहून अधिक गुन्हे दाखल आहेत.

बल्लूसिंग प्रभूसिंग टाक (वय ३०) आणि उजालासिंग प्रभूसिंग टाक (वय २७, दोघेही रा. रामटेकडी) असे अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. तर या प्रकरणात सोमनाथ नामदेव घारोळे, पिल्लूसिंग कालूसिंग जुन्नी, जलसिंग रजपुतसिंग दुधानी आणि गोरखसिंग गागासिंग टाक (सर्व रा. हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. सोमवारी (ता. ५) रात्री दोनच्या सुमारास आरोपी हे कोथरूडमधील पंचरत्न सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये दरोडा टाकत होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रात्रपाळीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले. घरफोडी करून जिन्याने उतरत असताना पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यात प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत एकजण पोलिसांच्या तावडीत सापडला. तर दुसऱ्याने पळ काढला. त्यावेळी पोलिसांनी त्याचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केल्यानंतर पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. बल्लूसिंग याच्यावर चोरीसह विविध प्रकारचे ६३ आणि उजालासिंग याच्यावर ७२ गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून २००८ पासून ते घरफोडीसारखे गुन्हे करीत असल्याचे सरकरी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयास सांगितले. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड. बेंडभर यांनी केली.

---------------------------------------------