शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल गावांच्या निर्मितीसाठी पुढाकार

By admin | Updated: February 14, 2017 01:43 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये ग्रामीम भागात डिजिटल

पुणे: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये ग्रामीम भागात डिजिटल गावा, डिजिटल शाळा, डिजिटल ग्रामपंचायत आणि डिजिटल आरोग्य केंद्रांच्या निर्मितीवर अधिक भर देण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक गावांमध्ये सिमेंटचे रस्ते, पिण्याचे शुध्द पाणी, प्रत्येक गावांत व्यायाम शाळा अन् ज्येष्ठ नागरिकांसाठी वेरंगुळा केंद्र करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा जाहीरनाम्यात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँगे्रसचा हा जाहीरनामा मागील निवडणुकीत दिलेली आश्वासने व केलेली कर्तव्यपूर्ती यावर अधिक भर देण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक विभागनिहया दिलेली आश्वासने व केलेली कामे यांचा सविस्तर आढावा घेण्यात आले आहे. यामध्ये गेल्या पाच वर्षांत तब्बल ३ हजार ८५ कोटी रुपयांची कामे केली असल्याचे म्हटले आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एका मोठ्या गावांमध्ये शाहू-फुले आंबेडकर ग्राम अभ्यासिका उभारण्यात येणार असून, संबंधित गाव परिसरातील विद्यार्थ्यांना युपीएसी, एमपीएसी अभ्यासक्रमासाठी याचा मोठ्या उपयोग होणार असल्याचे कंद यांनी सांगितले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ई-लर्निंग सुरु करणार, शंभर टक्के अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती देणार, मोठ्या गावांमध्ये शुध्द पाण्यासाठी आर.ओ यंत्र बसविणार, ग्रामीण भागात कच-यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, मोठ्या गावांसाठी कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रकल्प उभरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शंभर टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांना सौर ऊर्जा प्रकल्प सबविण्यात येणार, सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र योजना राबविणार, शंभर टक्के शौचालय असलेल्या गावांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार यासाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे.दरम्यान जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसने आपल्या जाहीरनाम्यात हजारो आश्वासने दिली असली तरी यातील बहुतेक आश्वासने ही सध्या सुरु असलेल्या सरकारी योजनाच आहेत. जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे, तुकडा बंदी कायदा, रस्त्यांची दुरुवस्था किंवा कोणतही नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचे आश्वासन देण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)