ओतूर परिसरातील बाधितांची एकूण संख्या १०६४ झाली आहे पैकी ९४८ बरे झाले आहेत ५२ जण उपचार घेत आहेत १५जण घरीच उपचार घेत आहेत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे .
. मंगळवारी ५ ,बुधवारी ९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ओतूर शहरातील बाधितांची संख्या५४३ झाली आहे. ४७६ बरे झाले आहेत ३४ जण कोव्हीड सेंटर तर ९ जण घरीच उपचार घेत आहेत २४ जणांचा मृत्यू झाला आहे.
डिंगोरे येथील ७० पैकी ६५ बरे झाले. ३ जण कोव्हीड सेंटर तर १ घरीच उपचार घेत आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. धोलवड येथील बाधितांची संख्या ४१ झाली आहे.३३ बरे झाले आहेत.. ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
खामुंडी येथील ३९पैकी फक्त २ जणावर उपचार सुरू आहेत. नेतवड माळवाडी १८पैकी १७ बरे तर एकावर उपचार सुरु केले आहेत. ठिकेकरवाडीत ४८ पैकी४२ बरे झाले आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीहरी साऱोक्ते यांनी दिली .