शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आयएसएमटी कंपनीत बेमुदत टाळेबंदी

By admin | Updated: February 17, 2017 04:39 IST

कोळविहिरे गावाच्या हद्दीतील सर्वांत मोठ्या आयएसएमटी या स्टील कंपनीने आजपासून बेमुदत टाळेबंदी जाहीर करून कंपनी बंद

जेजुरी : कोळविहिरे गावाच्या हद्दीतील सर्वांत मोठ्या आयएसएमटी या स्टील कंपनीने आजपासून बेमुदत टाळेबंदी जाहीर करून कंपनी बंद केली आहे. कंपनीने टाळेबंदी करून कामगारांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करीत कामगारांनी कंपनी गेटवरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जेजुरी-मोरगाव रस्त्यावर कोळविहिरे गावाच्या हद्दीतील घाटेवाडी येथे आयएसएमटी ही स्टीलचे उत्पादन करणारी येथील सर्वांत मोठी कंपनी आहे. कंपनीत कायम ३२१ कामगार, १६५ अधिकारी व प्रशासकीय, तांत्रिक कर्मचारी, तसेच ७५० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार आहेत. याशिवाय साधारणपणे दोन ते अडीच हजार कुटुंबांना या कंपनीचा फायदा होत आहे. या कंपनीने कामगारांचे सहकार्य मिळत नसल्याच्या कारणावरून आजपासून टाळेबंदी जाहीर केल्याने येथील कामगार वर्गात खळबळ माजली आहे. संतप्त कामगारांनी आज कंपनी गेटवर जमा होऊन कंपनी व्यवस्थापनाच्या या बेकायदेशीर टाळेबंदीचा निषेध केला आहे. गेटवरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील समन्वयासाठी या कंपनीत इस्साल एम्प्लॉईस युनियन असून युनियन आणि व्यवस्थापनात जानेवारी २०१४ पासून पगारवाढीबाबत संघर्ष सुरू आहे. ९ डिसेंबर २०१४ रोजी व्यवस्थापन आणि युनियन यांच्यातील बैठकीत ३३०० रुपयांचा पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, कंपनीने आर्थिक मंदीचे कारण सांगून कामगारांच्या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. गेली तीन वर्षे कंपनीकडून कामगारांना पगारवाढ न देता केवळ वेळ काढूपणाच केला आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाकडे पगारवाढीचा आग्रह धरला असता कंपनीकडून या मागणीकडे दुर्लक्षच केले आहे. या संदर्भात कामगार आयुक्तांसमोर ही युनियन व व्यवस्थापनाच्या वारंवार बैठका होऊन ही कंपनी आर्थिक मंदीचेच कारण सांगून कामगारांच्या पगारवाढीकडे दुर्लक्ष करीत आहेत. कामगारांनी संघर्षाची भूमिका घेतली असता कंपनीने आजपासून टाळाबंदीचा निर्णय घेतला आहे. हा कामगारांवर सरळ सरळ अन्याय असून, जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन करण्याचा निश्चय केल्याचे युनियनचे जगन्नाथ बरकडे, शोभाचंद डोके, मधुकर घाटे, पोपट खोमणे, रवींद्र फुले, रोहित घाटे आदींनी सांगितले. (वार्ताहर)