शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गुंडगिरीविरोधात इंदापूरकरांचा मोर्चा

By admin | Updated: June 13, 2014 05:20 IST

दहशतीच्या जोरावर गुंडगिरी करणारांवर कारवाई करावी. या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्रस्त नागरिकांच्या वतीने, तहसील कार्यालय, इंदापूर पोलीस ठाण्यावर आज (दि. १२ जून) मूकमोर्चा काढण्यात आला.

इंदापूर : दहशतीच्या जोरावर गुंडगिरी करणारांवर कारवाई करावी. या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्रस्त नागरिकांच्या वतीने, तहसील कार्यालय, इंदापूर पोलीस ठाण्यावर आज (दि. १२ जून) मूकमोर्चा काढण्यात आला.संबंधितांवर १५ जून पर्यंत कारवाई झाली नाही तर १६ जूनला तालुका पातळीवरचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव यांनी दिला आहे. अ‍ॅड. यादव, समता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल राऊत, स्वराज ग्रुपचे प्रमुख अतूल व्यवहारे, संघर्ष समितीचे पदाधिकारी पोपट शिंदे, रमेश शिंदे, कर्मयोगी सहकारीचे उपाध्यक्ष माऊली बनकर, बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंग मारकड, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलासराव मारकड आदींच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पटांगणातून मोर्चास सुरुवात झाली.तहसील कार्यालयावर सभा झाली. सभेत बोलताना अ‍ॅड. कृष्णाजी यादव गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे सर्वसामान्य लोक, महिला, महाविद्यालयीन युवती, छोटे व्यावसायिक त्रस्त झालेले आहेत. छेडछाड, हप्ता वसुली मारहाणीचे प्रकार यातून सुटका व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. उग्र आंदोलन करून लोकांना त्रास न करता, आम्ही मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले आहे. १५ जून पर्यंत कारवाई व्हावी. अन्यथा १६ जून ला तालुकापातळीवरचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तहसील कार्यालयातील अधिकारी नेवसे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. मोर्चामध्ये गणेश झगडे, बाळासाहेब व्यवहारे, बाळासाहेब म्हेत्रे, तात्यासाहेब वडापुरे, गजानन गवळी, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग शिंदे, दत्ता भिसे, पै. बजरंग राऊत, बाबजी भोंग, संदीप आदलिंग व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)