शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम

By admin | Updated: February 24, 2017 02:04 IST

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मागील निवडणुकीच्या तुलनेत जिल्हा परिषद गटाच्या

इंदापूर : इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मागील निवडणुकीच्या तुलनेत जिल्हा परिषद गटाच्या दोन जागा जादा मिळविल्या. मात्र, पंचायत समितीवर पुन्हा हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वखालील काँग्रेस पक्षाने सत्ता मिळविली आहे. त्यामुळे पंचायत समितीवर सत्ता मिळविण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न अपुरे राहिले. मागील पंचवार्षिकमध्ये एकूण सात जागांपैकी काँग्रेसकडे पाच जागा होत्या. पंचायत समितीच्या चौदापैकी नऊ जागा होत्या. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या पळसदेव-बिजवडी व काटी-वडापुरी या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याकडून हिसकावून घेतल्या. गणांपैकी शेटफळगढे, पळसदेव, लाखेवाडी, वडापुरी या गणावरची त्यांची सत्ता गेली. राष्ट्रवादी काँग्रेसची सणसर-लासुर्णे गटावरची सत्ता गेली. शेटफळगढे, पळसदेव, वडापुरी, लाखेवाडी या गणांवर व काटी-वडापुरी या गटावर त्यांची सत्ता प्रस्थापित झाली.पळसदेव बिजवडी गटातून सोनाई उद्योगसमूहाचे संचालक प्रवीणकुमार माने यांनी पहिल्यांदाच राजकीय निवडणुकीसाठी पाऊल उचलले होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे धडाकेबाज कार्यकर्ते दीपक जाधव यांनी उमेदवारी दाखल केली होती. या निवडणुकीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. दोघांनी ही उत्तम प्रचार यंत्रणा राबवली. सर्वाधिक शक्तिप्रदर्शन, सभा या गटात झाल्या. या निवडणुकीदरम्यान कळस पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य निवृत्ती गायकवाड यांनी काँग्रेसशी घरोबा केला होता. त्याचा काँग्रेसला काहीही फायदा झाला नाही. पोटनिवडणुकीत प्रताप पाटील विजयी झाले होते. या निवडणुकीत त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली पाटील भरघोस मतांनी निवडून आल्या. त्यांच्या कळस गावात त्यांना अकराशे मतांचे अधिक्य मिळाले. माजी आमदार कै. गणपतराव पाटील यांच्या घराण्याची प्रतिष्ठा कायम असल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले. भवानीनगरच्या अविनाश घोलप यांना या निवडणुकीने कही खुशी कही गमचा अनुभव दिला. सणसर गणातून घोलप यांचा मुलगा करणसिंह घोलप यांनी विजय मिळविला. त्यांची पत्नी वंदनादेवी घोलप यांना कळस-वालचंदनगर गटातून पराभवाचा सामना करावा लागला.(वार्ताहर)