शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर-माळशिरसच्या शेतकऱ्यांचे पाण्यासाठी आंदोलन

By admin | Updated: March 9, 2017 04:11 IST

इंदापूर व माळशिरस टा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी इंदापूर-अकलूज रस्त्यावरील सराटी येथे बुधवारी (दि. ८) रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दोन्ही तालुक्यांतील

बावडा : इंदापूर व माळशिरस टा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी इंदापूर-अकलूज रस्त्यावरील सराटी येथे बुधवारी (दि. ८) रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दोन्ही तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तातडीने नदीत पाणी सोडण्याचा निर्णय न झाल्यास कोरड्या नदीपात्रात उपोषण करण्याचा इशाराही या वेळी शेतकऱ्यांनी दिला. नीरा नदीवरील बंधाऱ्यांचे ढापे टाकण्याचे व्यवस्थापन १५ आॅक्टोबर १६ रोजी सुरू करण्यात आले. त्यामुळे नदीतील पाणी बंद झाले. परिणामी नीरा नदीवरील सर्व बंधारे पूर्णक्षमतेने भरले गेले नव्हते. याच गोष्टींचा विचार करून, पुणे पाटबंधारे अंतर्गत येणारे सर्व बंधारे पूर्णपणे भरून दिले. परंतु, नीरा उजवा कालवा फलटण यांच्या अंतर्गत येणारे इंदापूर व माळशिरस तालुक्यातील बोराटवाडी चाकाटी, आनंदनगर, अकलूज, सराटी, लुमेवाडी, गोंदी व ओझरे हे बंधारे कोरडेठाक राहिले. अनेकदा अर्ज, विनंत्या करूनही फलटण येथील संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे या परिसरात नदीकाठी येणारी माळशिरस तालुक्यातील बांगारडे, तिरवंडी, चाकोरे, कोंडबावी, आनंदनगर, अकलूज, माळीनगर, गणेशगाव, तांबवे, बिजवडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी, चाकाटी, पिठेवाडी, नीर-निमगाव, कचरवाडी, सराटी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, गिरवी आदी आदी गावांमधील शेती पाण्याअभावी धोक्यात आली. या संपूर्ण परिसरात नीरा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा तसेच चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, बावडा मंडल अधिकारी एस. टी. लोखंडे यांनी या शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. या वेळी तहसीलदार पाटील यांनी आपली मागणी शासनापर्यंत निश्चितपणे पोहोचवून लवकरच याविषयी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत एक बैठक घेऊन पाठपुरावा करू, असे सांगितले. या निवेदनावर अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समिती प्रदीप जगदाळे, दत्तात्रय घोगरे, हनुमंत कोकाटे, नवनाथ रुपनवर, समाधान बोडके आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या वेळी इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. (वार्ताहर)त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांचे ऊस जे कारखाने नेतात त्या संबंधित कारखान्यांनीदेखील या बंधाऱ्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासंबंधी लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करावी; अन्यथा भविष्यात इथला शेतकरी उसाचे एक टिपरू देखील या कारखान्यांना देणार नाही. - अप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती