शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अवकाळीचा फेरा सुरूच! राक्षेवाडीत गारपीट

By admin | Updated: April 11, 2015 05:14 IST

राक्षेवाडी-भांबुरवाडी परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने उन्हाळी बाजरी, कैऱ्या व तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दावडी : राक्षेवाडी-भांबुरवाडी परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने उन्हाळी बाजरी, कैऱ्या व तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तासभर गारांसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतात पाणीच पाणी केले. वाऱ्यामुळे उन्हाळी बाजरी पीक भुईसपाट झाले. झाडांवरील कैऱ्या खाली पडल्या. तसेच कोथिंबीर पीक गारांच्या माऱ्यामुळे शेतात आडवे झाले. पूर्व भागातील वाफगाव, गुळाणी, वाकळवाडी, वरूडे, कनेरसर या परिसरात शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. बहुतेक कांदा झाकण्यासाठी...आळेफाटा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यांसह विजेचा कडकडाट झाला. पावसाने तुरळक हजेरी लावली; मात्र यामुळे शेतकरीवर्गाची धांदल उडाली. आळेफाटा उपनगरात विक्रीस आलेला कांदा झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली. शेतकऱ्यांची धांदलखळद : पुरंदर तालुक्यातील खळद, शिवरी, तक्रारवाडी, वाळुंज, निळुंजसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. रस्ते, शिवारे जलमय झाली होती. शेतकऱ्यांची धांदल झाली. कांद्याची काढणी सुरू असून, तो भिजल्याने नुकसान झाले. फळबागांनाही त्याचा फटका बसला. यापूर्वी झालेल्या पावसाने आंब्याचा मोहर गळाला होतो. आता फळ धरत असताना हा वादळी पाऊस झाल्यान ती गळून पडली आहेत. डाळिंबपिकाला फटका बसला असल्याचे उत्पादक चंद्रकांत कामथे यांनी सांगितले.