शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

हौसेखातर वाढते प्रदूषण

By admin | Updated: December 17, 2014 05:33 IST

शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे आणि बीआरटी, मेट्रोसारखे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहेत. त्यामुळे गरज म्हणून नागरिकांचा खासगी गाड्या घेण्याकडे कल वाढला आहे

अमोल जायभाये, पिंपरी शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे आणि बीआरटी, मेट्रोसारखे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहेत. त्यामुळे गरज म्हणून नागरिकांचा खासगी गाड्या घेण्याकडे कल वाढला आहे. रस्त्यावर साडेअकरा लाखांपेक्षा जास्त वाहने धावत आहेत. चारचाकी गाडी असणे, हे प्रतिष्ठेचे मानले जाते. हौसेखातर दुचाकी गाड्या घेण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात सध्या ११ लाख ५४ हजार ४२३ वाहने धावत आहेत. त्यात दुचाकीचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये महिन्याला १० हजार वाहनांची त्यात भर पडत आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून शहरात सध्या ८ लाख ४४ हजार ९४८ दुचाकी आहेत. या वर्षी ८८ हजार ८०५ गाड्या वाढल्या आहेत. त्या पाठोपाठ १ लाख ८० हजार ५४२ मोटारी आहेत. या वर्षी २० हजार ५०६ मोटारींची भर पडली आहे. सर्वाधिक दुचाकी असल्यामुळे शहराच्या वाहतूक कोंडीतही मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. यात अनेक महागड्या गाड्या आहेत. प्रत्येक घरामध्ये कोणती ना कोणती गाडी दिसून येते. त्यामध्ये दुचाकी, तर प्रत्येक दारासमोर असतेच. मात्र, त्यामुळे शहरातील प्रदुषणात वाढ होत आहे. त्यामध्ये अनेक गाड्या जुन्या असल्याने त्यांची पीयूसी व्यवस्थित केली जात नाही. त्याचा परिणामही नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. मोठ्या प्रमाणात गाड्या वाढत असल्याने येथील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहत आहे. कंपनीतील कर्मचारी आणि सरकारी नोकर या वर्गात दुचाकी घेण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. एवढ्या गाड्या असल्यामुळे येथील रस्तेही कमी पडत आहेत. लोकसंख्या वाढत आहे. त्याच प्रमाणात गाड्याही वाढत आहेत. मात्र रस्ते तेच असल्याने आज वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. गाड्यांच्या धुरामुळे शहर परिसराचे वातावरण दुषित होत आहे. त्यामध्ये मुदत संपलेली वाहनेही बिनदिक्कतपणे रस्त्यावर धावत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. ही वाहने प्रदूषणात भरच टाकत आहेत. इतर गाड्याही मोठ्या प्रमाणात आहेत. येथे कंपन्या अधिक असल्यामुळे १४ हजार ४१३ ट्रकची नोंद आहे.