शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागात पाण्याची दाहकता वाढली

By admin | Updated: September 30, 2015 01:16 IST

पाण्याची भीषण टंचाई... जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न... वाढत चाललेला बेरोजगार हा दौंड तालुक्याच्या दक्षिण भागातील लोकांच्या पाचवीलाच पुजलेला.

खोर : पाण्याची भीषण टंचाई... जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न... वाढत चाललेला बेरोजगार हा दौंड तालुक्याच्या दक्षिण भागातील लोकांच्या पाचवीलाच पुजलेला. या भागाच्या पाण्याच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केलेले असून आगामी महिन्यात वरुणराजाने जर पाठ फिरवली तर पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन टंचाईच्या भीषणतेची मोठी झळ भासणार असल्याचे या भागामधील एकंदरीत चित्र आहे. मोठ्या आशा पल्लवीत करीत या भागातील शेतकरीवर्गाने खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, ऐन सुगीचा हंगाम केवळ पावसाच्या लांबणीने वाया गेला. या भागामधील जवळपास ३० टक्केच खरिपाचा हंगाम चांगल्या प्रकारे डौलारा धरू शकला. ७० टक्के खरीप हंगामाच्या पेरण्या या केवळ पाण्याअभावी वाया गेल्या. या भागाच्या पाणीप्रश्नावर आमदार राहुल कुल हे सातत्याने विधानसभेत पाठपुरावा करीत आहेत. पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी पाझर तलाव व जनाई-शिरसाई योजनेतून पद्मावती तलाव भरून द्यावा, अशी खोर भागामधील शेतकऱ्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यातून जनाई योजनेतून पद्मावती तलावात पाणी सोडण्यात आले होते. मात्र वर्षातून किमान दोन तरी आवर्तने पुरंदर योजनेतून व जनाई योजनेतून सोडण्याची सरपंच रामचंद्र चौधरी यांची व ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)