शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बाइकर्सची वाढली स्टंटबाजी

By admin | Updated: October 28, 2015 01:23 IST

कासारवाडीमध्ये बायकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसभर शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या सुमारास

पिंपरी : कासारवाडीमध्ये बायकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसभर शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या सुमारास ही मुले ठरलेल्या परिसरात हमखास स्टंटबाजी करतात. रेल्वेगेटखालील व वरील बाजूचा हा परिसर आहे. यामध्ये शास्त्रीनगर, जवळकर कॉलनी, जनसेवा चौक, हिराबाई झोपडपट्टी, गुलिस्ताननगरमध्ये गाड्या विचित्र पद्धतीने चालविण्याचे हे प्रकार घडत आहेत. गाड्यांना वेगळ्या प्रकारचे सायलेन्सर बसवलेले आहेत. त्यामुळे गाडीतून वेगवेगळ्या प्रकारचे आवाजही निघतात. ज्येष्ठ नागरिकही या प्रकाराने वैतागले आहेत. बाइक स्टंंट करणाऱ्यामधील काही मंडळी ही धनदांडग्या परिवारातील आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी होते. या उनाडक्या करणाऱ्या मुलांवर कारवाईचा बडगा उगारला जात नाही, असे काही नागरिकांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या रस्त्यावर ज्येष्ठ मंडळी जीव मुठीत घेऊन चालतात. दोन ते तीन महिन्यांपूर्वी दुचाकी वेगाने चालविणाऱ्या एका तरुणाला जीव गमावण्याची वेळ आली आहे. ही मुले भरधाव गाड्या चालवीत एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत चकरा मारत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान निगडी प्राधिकरणातही महाविद्यालयसमोर टवाळखोरांचा त्रास वाढला आहे. भरधाव वेगात गाड्या चालविणे तसेच महाविद्यालयाच्या समोर चकरा मारणे, युवतींना त्रास देणे असे प्रकार वाढले आहेत. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. परंतु पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाईचे धोरण अवलंबवावे अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)