शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

भोर शहरात अनाधिकृत व बेकायदेशीर बांधकामात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:11 IST

वाढ होत असून त्यांच्यावर नगरपालिकेकडून न कारवाई केली जाते ना नव्या अनधिकृत बांधकामांना अटकाव केला जात आहे. उलट नगरपालिकेकडून ...

वाढ होत असून त्यांच्यावर नगरपालिकेकडून न कारवाई केली जाते ना नव्या अनधिकृत बांधकामांना अटकाव केला जात आहे. उलट नगरपालिकेकडून त्यांना ड्रेनेज, पाणी, रस्ता आदी सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यामुळे नगरपालिकेने लक्षावधी रुपयांचा कर बुडत असून सोयी सुविधा पुरविण्याच्या माध्यमातून करबुडव्यांसाठी लाखो रुपये नाहक खर्च होत आहेत.

अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी आल्यानंतर केवळ नोटीस देऊन दिखावा केला जात आहे. प्रशासनाच्या कारवाईत नगरसेवकांचा हस्तक्षेप होत असल्यामुळे ही कारवाई होत नाही. तर काही ठिकाणी प्रशासनाकडूनच ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्यामुळे भोर शहर दिवसेंदिवस बेकायदेशीर बांधकामांचे शहर बनत आहे.

बांधकाम सुरु असल्याची माहिती नागरिकांनी नगरपालिका प्रशासनास दिल्यानंतर केवळ दिखावा म्हणून एखादी नोटीस संबंधीताला दिली जाते. मात्र त्यास बांधकाम करण्यास नगरपालिकेतील काही पदाधिकारीच मदत करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही त्याची नगरपालिकेडे तातडीने नोंद केली जात नाही. नगरपालिकेच्या चार वर्षानंतर होणाऱ्या सर्वेक्षणातच त्याची नोंद केली जाते. तोपर्यंत संबंधी कुठलाही कर घेतला जात नाही. मात्र सदर इमारतीस पाणी व इतर सर्व सोयी पुरविल्या जातात.

बांधकाम नियमाप्रमाणे नसले तरीही त्यास प्रमाणपत्र मात्र दिले जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांच्याजवळील जुन्या बांधकामाच्या नुतनीकरणाची परवानगी घेतली जाते. तेथे पूर्णताहा नवीन बांधकाम केले जाते. याकडे नगरपालिका प्रशासन फारसे गांभीर्यांने पाहात नाही.

--

कोट

अनाधिकृतपणे झालेल्या बांधकांमाना नोटीसा देण्यात येत असून नवीन अनाधिकृत बांधकामे थांबविण्यात येतील. सर्व नागरिकांनी नवीन बांधकामे करण्यासाठी किंवा नुतनीकरण करण्यासाठी नगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे सक्तीचे केले जाईल. तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कडक कारवाई केली जाईल.

डॉ. विजयकुमार थोरात,

मुख्याधिकारी भोर नगरपालिका