बाळासाहेब काळे - जेजुरी
महसूल विभाग आणि जिल्हा पुरवठा शाखा यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात एक दिवसाचे जीर्ण झालेल्या शिधापत्रिका नवीन करणो, एकत्र कुटुंबातील शिधापत्रिका विभक्त करणो, हरविलेल्या शिधापत्रिका नव्याने बनवून देणो आदी शिधापत्रिकासंदर्भात असणा:या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तेथील तहसील कार्यालयाच्या सोयीने दिवस ठरवून एक दिवसाचे प्रत्येक मंडल विभागात शिबिर आयोजित केले आहे. शिबिरात प्रत्येक विभागाचे मंडल अधिकारी त्या-त्या मंडलातील गावा-गावांतील गाव कामगार तलाठी यांच्या उपस्थितीत शिधापत्रिकाधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अर्ज स्वीकारल्यानंतर एक महिन्यात नवीन शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहेत. मात्र, हे एक दिवसाचे शिबिर न ठेवता ते किमान आठवडाभर ठेवणो आवश्यक असल्याचे शिधापत्रिकाधारक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सांगत आहेत. शासनाने तशी व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आज पुरंदर तालुक्यात असेच
एक दिवसाचे शिबिर आयोजित
केले होते.
तालुक्यातील सासवड, जेजुरी, शिवरी, परिंचे, वाल्हे, नायगाव, नारायणपूर आदी ठिकाणी सकाळी
9 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेर्पयत ही शिबिरे पार पडली. मात्र,
शिबिराचे नेमके नियोजन नसल्याने शिधापत्रिका धारकांना मनस्ताप
सहन करावा लागला.
शिधापत्रिका नवीन मिळवणो, विभक्त करणो, जुन्या व जीर्ण झालेल्या बदलून देणो, हरवलेल्या नव्याने तयार करून देणो आदी अडचणी सोडवण्यासाठी लागणारी कागदपत्रे नेमकी कोणती हवीत, हेच अनेकांना माहीत नसल्याने त्यांना दिवसभर हेलपाटे मारावे लागले, तर अनेकांना रिकामेच परतावे लागले.
विभक्त शिधापत्रिका करण्यासाठी वेगळे राहत असल्याचा पुरावा कोणीही एका दिवसात उपलब्ध करू शकत नाही. हरवलेल्या शिधापत्रिकसाठी पोलीस ठाण्याचा दाखला एकाच दिवसात मिळणो शक्यच नाही. नावे कमी करणो, जीर्ण व फाटलेली शिधापत्रिका बदलून देणो, एवढेच शक्य होत होते.
शिधापत्रिकाधारकांचा उडाला गोंधळ
4मात्र, इतर अडचणींसाठी लागणारे पुरावे उपलब्ध न होऊ शकल्याने शिधापत्रिकाधारकांचा गोंधळ उडत होता. त्यातच कोणताही गाजावाजा अथवा लोकांर्पयत माहिती न पोहोचवता झालेले हे शिबिर त्या अर्थाने कुचकामीच ठरले आहे. नागरिकांच्या कोणत्याच अडचणीची सोडवणूक या शिबिरातून झालेली नाही. प्रत्येक मंडल विभागातील या शिबिरांचे यशस्वी आयोजन झालेले नाही. यामुळेच एक दिवसाचे हे शिबिर न ठेवता सप्ताहाचे स्वरूप देणो गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
तलाठी गैरहजर; शिबिराचा उपयोगच नाही
4तालुक्यातील तहसील कार्यालयाकडून प्रत्येक गावा-गावात गाव कामगार तलाठय़ामार्फत या संदर्भातील अधिकृत माहिती पुरवणो आवश्यक आहे. शिधावाटप दुकानदार आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन गरजेचे आहे. शिधापत्रिकेचे नेमके काय करायचेय, आणि त्यासाठी लागणारे दाखले, पुरावे कोणते हवेत याची माहिती शिधापत्रिकाधारकांर्पयत पोहोचवणो अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या शिबिरात नेमकी माहिती नसल्याने शिधापत्रिकाधारकांत मोठा गोंधळ उडाला होता. त्यातच अनेक गावांतील गाव कामगार तलाठी हजर नसल्याने अनेक गावातील शिधापत्रिकाधारकांना या शिबिराचा काहीच उपयोग झालेला नाही.
योग्य नियोजन करून योजना करा
4शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी जशी एक दिवस हे शिबिर आयोजित केल्याची अधिसूचना काढली, तशीच सूचना एक सप्ताहासाठी काढावी. त्याचे शासकीय यंत्रणोमार्फत योग्य नियोजन करावे, यामुळे कोणीही शिधापत्रिकाधारक या योजनेपासून वंचित राहणार नाही. मुळातच 1999 मध्ये तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना नवीन शिधापत्रिका देण्यात आल्या होत्या. 15 वर्षानंतर आज त्या जीर्ण व फाटल्या आहेत. तसेच, यापूर्वी तीन वेळा अशाच प्रकारे केवळ अर्ज भरून घेतले होते. मात्र, शिधापत्रिका देण्यात आलेल्या नव्हत्या. आता अत्यंत लोकप्रिय व लोकहिताची ही योजना योग्य नियोजन करून पुरेसा वेळ देऊन पूर्ण करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.