शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या फेऱ्यांमध्ये वाढ

By admin | Updated: November 14, 2015 03:11 IST

शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीकपात लागू केल्यानंतर टँकरच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे

पुणे : शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीकपात लागू केल्यानंतर टँकरच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत टँकरच्या फेऱ्यांमध्ये ८ हजार १२६ फेऱ्यांनी वाढ झाली आहे. पाण्याचा कमी दाबाने अपुरा पुरवठा होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यांमध्ये निम्माच पाणीसाठी असल्याने यंदा शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने शहराच्या अनेक भागांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. विशेष अनेक मजली सोसायट्यांना पाणी कमी पडत असल्याने दररोज पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत. यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये १५ हजार ४५२ टँकरची मागणी नोंदविली गेली आहे, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये १२ हजार टँकरची आवश्यकता भासली होती. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात ११ हजार ५५० टँकरने पाणीपुरवठा झाला होता. यंदा आॅक्टोबर महिन्यात टँकरच्या १६ हजार २३३ फेऱ्या कराव्या लागल्या आहेत. पाणीकपात लागू होण्यापूर्वी केवळ आॅगस्ट १४ हजार टँकरची मागणी नोंदविली गेली होती. मागील वर्षीची तुलनेत पाणी कपातीनंतर टँकरच्या फेऱ्यांमध्ये ८ हजारांनी वाढ झाली झाली आहे. नागरिकांकडून टँकरची मागणी आल्यास महापालिकेकडून सवलतीच्या दरात टँकर पुरविले जातात. पाण्याचा अपुरा पुरवठा होणारा उपनगरांचा भाग, बाणेर, पाषाणमधील सोसायट्या यांच्याकडून टँकरची मागणी नोंदविली जात आहे. गैरवापर होऊ नये, म्हणून टँकरला जीपीएस बसविण्यात आली आहे. मात्र जीपीएस सिस्टिमचा वापर प्रभावीपणे सुरू नसल्याचे दिसून येते. त्यामुळे टँकरच्या पाण्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचे प्रकार अद्याप सुरूच आहेत.