पुणे : शहरात मंगळवारी २३३ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. ३४३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ३९८ संशयितांची तपासणी केली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ६.८ टक्के इतकी आहे़
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये २२२ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहे. ऑक्सिजनसह उपचार घेणा-यांची संख्या ४५५ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या २ हजार ७२५ इतकी आहेत़ आज दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६५४ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख ३५ हजार ५६० जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी १ लाख ७९ हजार ९६६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७२ हजार ५८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़