शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आकस्मिक आगीत दुकाने भस्मसात

By admin | Updated: May 26, 2017 05:45 IST

येथील जुना मोटारस्टँड येथे गुरुवारी (दि. २५) सकाळी दोन इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागली. आगीत एका दुकानातील संपूर्ण वस्तू खाक झाल्या

लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : येथील जुना मोटारस्टँड येथे गुरुवारी (दि. २५) सकाळी दोन इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागली. आगीत एका दुकानातील संपूर्ण वस्तू खाक झाल्या, तर दुसऱ्या दुकानातील साहित्य तत्काळ बाहेर काढले, काही वस्तूंना आगीची झळ बसली. अंदाजे ६०ते ७० लाख रुपायांचे नुकसान झाले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी : येथील आशिष इलेक्ट्रॉनिक, मयूरी इलेक्ट्रॉनिक ही दोन दुकाने शेजारी शेजारी आहेत. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यातील मयूरी इलेक्ट्रॉनिक या दुकानाला अचानक आग लागली. आगीचा लोट काही वेळातच वाढत गेल्याने इमारतीमध्ये धुराचे लोट पसरले होते. फोटो स्टुडिओतील काही वस्तू जळून खाक झाल्या. मुख्य रस्त्यावर असणाऱ्या दुकानांना आग लागल्याने बाजूला राहणाऱ्या लोकांची धांदल उडाली. वेळीच आतमध्ये असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी राजगुरुनगर नगरपरिषद, सेझ व चाकण एमआयडीसीमधील अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने मागविण्यात आल्या. आग लागलेली दुकाने मोठी असल्यामुळे आग विझवण्यात अडथळे येत होते. आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली. दरम्यान, येथे बघ्यांनी मोठी गर्दी केली. सहा तासांनंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले. मात्र, या आगीमध्ये दुकानांतील सर्व साहित्यासह फर्निचर, एक दुचाकी आगीत जळून खाक झाल्याने ६० ते ७० लाखांपर्यंत नुकसान झाले आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. खेडचे प्रांताधिकारी सुनील गाढे, पोलीस उपविभागीय अधिकारी राम पठारे, खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.