शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मिळकत कर ४० कोटींनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 01:39 IST

महापालिकेच्या वतीने यंदा पहिल्यांदाच मिळकत कराची सवलत योजना ३० जूनपर्यंत वाढविली होती

पुणे : महापालिकेच्या वतीने यंदा पहिल्यांदाच मिळकत कराची सवलत योजना ३० जूनपर्यंत वाढविली होती, त्याचा चांगला फायदा पालिकेला झाला असून, पालिकेला त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ४० कोटी रुपयांचे उत्पन्न अधिक मिळाले आहे. जुलै महिन्यापासून मिळकत करावर दर महिना २ टक्के दंड पालिकेकडून आकारला जाणार आहे.शहरात ८ लाख मिळकतीधारक आहेत. वेगवेगळ्या कारणांनी अनेक मिळकतींची थकबाकी राहिलेली होती. मागील वर्षी प्रशासनाने अभय योजना राबवून ही थकबाकी वसूल करण्यात मोठे यश मिळविले. त्यापाठोपाठ यंदा मिळकत कराची चांगली वसुली करण्यात प्रशासनाल यश आले आहे. त्यासाठी नागरिकांना पोस्टाने घरपोच बिले पाठविणे, आॅनलाइन पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करणे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यंदा दीड लाख मिळकतधारकांनी आॅनलाइन कर भरलेला आहे. एकूण ८ लाख मिळकत- धारकांपैकी साडेपाच लाख मिळकतधारकांनी भरणा केला आहे. उर्वरित अडीच लाख धारकांना जुलै महिन्यापासून दंड आकारला जाणार आहे. >पालिका प्रशासनाला यशमहापालिकेच्या वतीने पूर्वी सवलतीच्या दरात मिळकत कर भरण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत दिली जात होती, यंदा ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली. मागील वर्षी ३० जूनपर्यंत ५६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा ३० जूनपर्यंत ६०० कोटींचा पल्ला गाठण्यास पालिका प्रशासनास यश आले आहे.