शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मिळकत कराची सुविधा ‘आपल्या दारी’

By admin | Updated: April 26, 2015 01:14 IST

राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी या योजनेच्या धर्तीवर महापालिकेकडून ‘मिळकत कर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

पुणे : राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी या योजनेच्या धर्तीवर महापालिकेकडून ‘मिळकत कर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शहरातील दोनशेहून अधिक घरे असलेल्या मोठ्या सोसायट्यांमध्ये महापालिकेचे पथक जाऊन कराच्या रकमेचे धनादेश नागरिकांकडून स्वीकारणार आहे. येत्या १ मेपासून हा नवीन उपक्रम सुरू करण्यात येणार असून ३१ मेपर्यंत असणार आहे.या आर्थिक वर्षात राज्यशासनाकडून एलबीटी रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असून त्याचा फटका शहरातील विकासकामांना बसणार आहे. त्यामुळे एलबीटी खालोखाल महापालिकेस सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या मिळकत कराच्या वसुलीकडे प्रशासनाने आपला मोर्चा वळविला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रशासनाकडून पहिल्यांदाच पोस्टाच्या माध्यमातून बिलांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ८० टक्के बिलांचे यशस्वी वाटप झाले असून पहिल्याच महिन्यात महापालिकेस तब्बल १५० कोटींचा विक्रमी उत्पन्नाचा टप्पा ओलांडता येणार आहे. धनादेशच स्वीकारणार उपक्रमाअंतर्गत महापालिकेकडून सोसायटीस्तरावर संकलित करण्यात येणार मिळकत कराची रक्कम केवळ धनादेशाद्वारेच स्वीकारली जाणार आहे. (प्रतिनिधी)असा असेल उपक्रम महापालिकेकडून ३१ मेपूर्वी कर भरणाऱ्या नागरिकांना ५ ते १० टक्क्यांपर्यंतची कर सवलत देण्यात येते. जास्तीत जास्त नागरिकांनी एप्रिल ते मे या पहिल्या दोन महिन्यांतच जास्तीत जास्त कर भरावा, या उद्देशाने मिळकत कर आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर २०० हून अधिक मिळकती असलेल्या सोसायट्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रत्येक सोसायटीत त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेनुसार, करसंकलन विभागाची मोबाईल व्हॅन जाईल. त्यात महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्यासह पालिकेने नेमून दिलेल्या नागरी सुविधा केंद्रातील कर्मचारी असतील. हे पथक नागरिकांकडून धनादेशाद्वारे कराची रक्कम स्वीकारतील आणि त्यांना त्याच ठिकाणी कर जमा केल्याची पावतीही देतील. त्यासाठी करसंकलन विभागाकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी मोबाईल व्हॅनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.