शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मिळकत कर विभाग कॅशलेस

By admin | Updated: May 18, 2017 06:05 IST

केंद्र सरकारच्या कॅशलेस व्यवहारांना पुणेकरांनी सर्वाधिक प्रतिसाद दिलेला दिसतो आहे. महापालिकेच्या मिळकत कर विभागातील वसुलीवरून तरी तसेच दिसते

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र सरकारच्या कॅशलेस व्यवहारांना पुणेकरांनी सर्वाधिक प्रतिसाद दिलेला दिसतो आहे. महापालिकेच्या मिळकत कर विभागातील वसुलीवरून तरी तसेच दिसते आहे. या विभागाच्या आतापर्यंतच्या ३०४ कोटी रुपयांच्या वसुलीपैकी फक्त २२ टक्के वसुली रोख म्हणजे नोटांच्या स्वरूपात झाली आहे.मिळकत कर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी ही माहिती दिली. या विभागाच्या वतीने नागरिकांनी आपला कर आॅनलाईन जमा करावा, यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याला चांगले यश मिळते आहे, असे मापारी यांनी सांगितले. आॅनलाईन व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे, असे मापारी यांनी सांगितले. धनादेशाच्या स्वरूपात जमा झालेला कर लक्षात घेतला तर कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण तब्बल ७८ टक्के झाले आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर डेबिट कार्डद्वारेही कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या ही सुविधा नाही. त्यात काही तांत्रिक स्वरुपाच्या अडचणी आहेत. प्रामुख्याने बँकेतून कर जमा झाल्यानंतर संबंधिताला त्याच्या मोबाईलवर कर जमा झाल्याचा संदेश कसा मिळेल, याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मापारी यांनी सांगितले. शहरातील किराणा मालाच्या दुकानांमधूनही मालमत्ता कर जमा करण्याची सुविधा एका कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे, मात्र यात संबंधितांना कमीशन म्हणून अगदीच कमी रक्कम मिळणार आहे. तसेच वर्षातून एकदाच हा व्यवहार होईल. त्यामुळे या योजनेला कमी प्रतिसाद मिळत आहे. आॅनलाईन प्रशिक्षणाचा प्रयत्नमहापालिकेच्या वतीने आॅनलाईन व्यवहाराचे नागरिकांना प्रशिक्षण देता येईल का, याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मापारी यांनी दिली. यंत्राद्वारे मतदान करण्याबाबत जसे मतदारांना प्रशिक्षण देण्यात येते त्याचप्रमाणे नागरिकांना ते रोख स्वरूपात पैसे जमा करण्यास आले, की तिथेच त्यांना आॅनलाईन प्रशिक्षण देता येईल का, त्यासाठी काही कर्मचारी नियुक्त करता येतील का, याचा विचार मिळकत कर विभाग करीत आहे.