शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मिळू शकते तेवढेच उत्पन्न

By admin | Updated: June 13, 2014 05:08 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेला जकातीऐवजी सुरूकेलेल्या एलबीटीद्वारे ११०० कोटी रुपये मिळणे आवश्यक आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला जकातीऐवजी सुरूकेलेल्या एलबीटीद्वारे ११०० कोटी रुपये मिळणे आवश्यक आहेत. ही रक्कम एलबीटी रद्द करून मूळ विक्रीवर उलाढाल कर लावून जमा होऊ शकते. मालाच्या आयात खरेदीवर दोन टक्के प्रवेशकर आकारल्यास पालिकेला सुमारे १२०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा दावा पिंपरी-चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रिज, कॉमर्स, सर्व्हिस अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष अ‍ॅड. अप्पासाहेब शिंदे आणि उपाध्यक्ष प्रेमचंद मित्तल यांनी केला आहे.मुंबई येथील बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एलबीटीबाबत महापालिकांनी स्थानिक व्यापारी संघटना, उद्योजक आणि संबंधितांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असे सांगितले आहे. याबाबत अ‍ॅड. शिंदे आणि मित्तल यांनी महापौर मोहिनी लांडे आणि आयुक्त राजीव जाधव यांना निवेदन देऊन एलबीटी न राबवताही अपेक्षित उत्पन्न कसे मिळवता येऊ शकते, याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे. आयुक्तांनी नोंदणीधारक व्यापाऱ्यांची संख्या आणि त्यांची मूळ विक्री याची आकडेवारी मागवून महापालिकेला ११०० कोटी रुपये मिळतील इतका कर लावावा. पिंपरी -चिंचवडमधून ४१८६ कोटी विक्रीकर मिळतो. याचा अर्थ येथील उलाढाल सुमारे ८३७२० कोटी रुपयांची आहे. उलाढालकराचा दर ०.०१४ इतका असावा. थोडक्यात शेकडा कर १.४० लावला, तर कोणतीही यंत्रणा न राबवता महापालिकेस १२०० कोटी हमखास मिळतील.एलबीटी रद्द करून मूळ विक्रीवर उलाढाल कर आकारावा अशी मागणी आहे. या कराची आकारणी व्यापारी व उद्योजक बिलामध्ये करणार नाहीत. त्यामुळे खरेदीकराची वजावट येणार नाही. हा कर केवळ फायदा-तोट्याचा विचार न करता केवळ विकासासाठी देण्यासाठी ते तयार आहेत.व्हॅट नोंदणीधारक मनपा हद्दीत आयात करतील त्या मालावर प्रवेशकर आकारावा. त्यामुळे व्यापारी व उद्योजक व्हॅटच्या विवरणपत्रासह विक्रीकर भरतानाच आयातीवरील प्रवेशकर मनपाच्या खात्यावर तिमाही किंवा सहामाही पद्धतीने भरतील. सध्या एकूण खरेदीपैकी मध्यम व मोठे उद्योग सुमारे ८० टक्के कच्चा माल आयात करतात. २० टक्के स्थानिक खरेदी असते. लघु उद्योजकांची आयात २० टक्के आणि स्थानिक खरेदी ८० टक्के असते. मूळ विक्री उलाढाल ८३७२० कोटींच्या ८० टक्के ६६९७६ कोटी खरेदी मोठे व मध्यम उद्योग करतात. त्यांपैकी ६०२७६ कोटी आयात खरेदी व ६७०० कोटी करमुक्त खरेदी होते. आयात खरेदीवर १.९९ म्हणजेच दोन टक्के प्रवेशकर लावल्यास १२०५ कोटींचे वार्षिक उत्पन्न हमखास मिळेल. दर वर्षी महागाईवाढीमुळे १० ते २० टक्के उत्पन्न वाढेल. (प्रतिनिधी)