शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

रिपाइंसमोर निवडणूक चिन्हाचा पेच

By admin | Updated: January 10, 2017 03:54 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने (आठवले गट) आगामी महापालिका निवडणुका भारतीय जनता पक्षासोबत युती करून

पुणे : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने (आठवले गट) आगामी महापालिका निवडणुका भारतीय जनता पक्षासोबत युती करून लढविल्या जाणार आहेत. या निवडणुकीला सामोरे जाताना स्वतंत्रपणे पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवायच्या की भाजपाचे कमळ हाती घ्यायचे, असा पेच सध्या रिपाइंसमोर निर्माण झाला आहे.रिपाइं स्वतंत्र चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्यांना भाजपाच्या परंपरागत मतांचा आणि मोदी लाटेचा लाभ उठविता येणार नाही किंवा भाजपाचे कमळ चिन्ह घेऊन रिपाइंचे उमेदवार मतदारांसमोर गेल्यास त्यांचा मतदार कमळ या चिन्हावर मतदान करणार का, असा दुहेरी पेच रिपाइंसमोर निर्माण झाला आहे. हा तिढा लवकरात लवकर त्यांना सोडवावा लागेल, कारण सर्व मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचविण्यासाठी त्यांच्या हातात खूपच कमी वेळ राहिलेला आहे.भाजपा आणि रिपाइंच्या वैचारिकतेमध्ये मोठा फरक आहे. रामदास आठवले भाजपामध्ये गेल्यापासून त्यांना या प्रश्नांना सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. दलित चळवळीतील कार्यकर्त्यांना या युतीची वास्तविकता पटवून देण्याची मोठी जबाबदारी रिपाइंच्या स्थानिक नेत्यांना पार पाडावी लागेल. महापालिकेच्या सभागृहातील सदस्यांची संख्या मोजकीच असली तरी रिपाइंने मागासवर्गीय तसेच गोरगरिबांच्या प्रश्नांना सभागृहात वेळोवेळी वाचा फोडली आहे. महापालिकेच्या निवडणुका १९९७मध्ये त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने लढविल्या गेल्या होत्या, त्या वेळी रिपाइंचे ७ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर २००२, २००७, २०१२ या तिन्ही निवडणुकांत रिपाइंच्या नगरसेवकांचा आकडा २ पर्यंतच मर्यादित राहिला होता. आगामी २०१७च्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका लढविल्या जात आहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा छोट्या पक्षांना मोठा फटका बसेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, भाजपासोबत युती करून रिपाइं या निवडणुकीला सामोरी जात असल्याने त्याची झळ त्यांना कमी बसण्याची शक्यता आहे.रिपाइंच्या दोन नगरसेवकांपैकी एक नगरसेविका सुनंदा देवकर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश केला आहे. रिपाइंकडून भाजपाकडे २८ जागांची मागणी करण्यात आली आहे; मात्र भाजपाकडून त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी जागा रिपाइंला सोडल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिपाइंला मिळालेल्या मर्यादित जागांवर पक्षाची संपूर्ण ताकद लावून तिथून विजय मिळवावा लागणार आहे.