शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाबरोबरच मैदानी खेळालाही महत्त्व द्या

By admin | Updated: June 12, 2017 01:13 IST

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाला महत्त्व दिल्यास सुदृढ समाजाची निर्मिती होऊ शकेल, असा आशावाद आमदार दत्तात्रय भरणे यांनी येथे व्यक्त केला

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाला महत्त्व दिल्यास सुदृढ समाजाची निर्मिती होऊ शकेल, असा आशावाद आमदार दत्तात्रय भरणे यांनी येथे व्यक्त केला. येथील मारकड कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे अध्यक्षस्थानी होते. शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मण आसबे या वेळी उपस्थित होते.भरणे म्हणाले, की मारकड कुस्ती प्रशिक्षण केंद्रासारख्या क्रीडा माध्यमांनी कुस्तीसारखा मर्दानी क्रीडाप्रकार ग्रामीण भागात जिवंत ठेवला आहे.अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, ‘‘मुलांना ज्या क्रीडाप्रकारात रस आहे त्या क्रीडाप्रकाराकरिता पालकांनी त्यास प्रोत्साहन दिले तर निश्चितच यश मिळते. आयुष्यात सूटबूट कधीही मिळतील, पण निरोगी शरीर मिळत नाही. याची जाणीव नव्या पिढीने ठेवावी. कसलेही व्यसन करू नये. मोबाईलचा अतिरेक टाळावा.’’ या वेळी डॉ. लक्ष्मण आसबे यांचे भाषण झाले. मारकड कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक मारुती मारकड यांनी प्रास्ताविक केले. कुस्ती पंच शरद झोळ यांनी सूत्रसंचालन केले. वस्ताद अशोक करे यांनी आभार मानले. बाळा ढवळे, डॉ. शशिकांत तरंगे, दत्तात्रय जाधव, माऊली शिंदे, अ‍ॅड. संदीपान भोसले, दत्तू भिसे, हरिदास मारकड व कुस्तीरसिक या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आबा शिंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात १५७ कुस्तीगीरांनी सहभाग घेतला. पाच मुलीही सहभागी झाल्या होत्या. त्यांना एनआयएस कुस्ती कोच माधुरी घराळ यांनी प्रशिक्षण दिले. सन २००० ते २००८ असे प्रत्येक वर्षाचा एक गट करून, नऊ वयोगटात शिबिरार्थीची विभागणी करण्यात आली होती. शिबिरार्थींना आधुनिक कुस्ती प्रशिक्षणाबरोबरच धावणे, शारीरिक शिक्षण, दोर चढणे, योगासने, पायाभूत जिम्नॅस्टिक आदींचे धडे देण्यात आले.