शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला टिकणारे ‘कायदेशीर’ ओबीसी आरक्षण लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST

बारामती : राज्य शासनाने मराठा समाजाला दिलेले 'एसइबीसी' वर्गातील आरक्षण नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. यामुळे महाराष्ट्रभर मराठा ...

बारामती : राज्य शासनाने मराठा समाजाला दिलेले 'एसइबीसी' वर्गातील आरक्षण नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. यामुळे महाराष्ट्रभर मराठा समाजात तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसून आली. हा निकाल अतिशय दुर्दैवी व मराठा समाजावर सर्वार्थाने अन्यायकारक आहे. यामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

मराठा समाजाला सरसकट इतर मागासवर्ग (ओबीसी) वर्गाचे आरक्षण लागू न करता वेळोवेळी सर्वच राजकीय पक्षांच्या सरकारांनी मराठा समाजाला असंवैधानिक श्रेणीतील आरक्षण लागू केले. मराठा समाज व मराठा संघटनांना झुलवत ठेवले. मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली गेली. याबाबत वेळोवेळी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राज्य शासनाच्या या भूमिकांचा जाहीर निषेध केला आहे. केंद्र सरकारने विशेष घटना दुरुस्तीच्या माध्यमातून राज्यघटनेत नवे ३४२ (अ) कलम आणले आणि 'एसईबीसी' हा नवीन प्रवर्ग निर्माण केला आहे. तांत्रिक व कायदेशीर अंगाने विचार केला, तर कलम ३४० अंतर्गत असलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यात व ३४२ (अ) यामध्ये फरक दिसून येत नाही. या कारणांमुळेच सुरुवातीपासूनच मराठासमाजाला संवैधानिक व सगळीकडे टिकणारे कायदेशीर सरसकट ओबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणी करीत आहे आणि ते त्वरित सरकारने करावे, या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हाउपाध्यक्ष सुनील पासलकर, जिल्हा सचिव विनोद जगताप, बारामती तालुकाध्यक्ष तुषार तुपे, दौंड तालुकाध्यक्ष कुलदीप गाढवे, इंदापूर तालुकाध्यक्ष मकरंद जगताप, पुरंदर तालुकाध्यक्ष संदीप बनकर, पुणे जिल्हा कार्यध्यक्ष रमेशचव्हाण, जिल्हा संघटक सचिन अनपट, बारामती शहराध्यक्ष अजित भोसले, जिल्हाकृषी आघाडी अध्यक्ष कांतीलाल काळकुटे, बारामती तालुका संघटक रणजित जगताप, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमर फुके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

फोटोओळी—मराठा समाजाला टिकणारे 'कायदेशीर' ओबीसी आरक्षण लागू करा ,अशी मागणी बारामतीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. याबाबत प्रांताधिका-यांना निवेदन देण्यात आले.

१४०५२०२१ बारामती—०६