लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वेगाने पुढे येत असलेली पुण्याची प्रतिभावान टेबल टेनिस खेळाडू पृथा वर्टीकर हिने राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस (मध्य विभाग) स्पर्धेत ठसा उमटवताना १२ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये उपविजेतेपद प्राप्त केले. इंदूरमध्ये ही स्पर्धा झाली. फायनलमध्ये कडवा प्रतिकार करूनही हरियाणाच्या सुहाना सैनीकडून ४-३ अशा गेमने पराभूत झाल्याने पृथाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पृथा ही सुहानाकडून ११-९, १०-१२, ८-११, ११-६, ५-११, ११-६, ६-११ने पराभूत झाली.चौथ्या गेमअखेरदोन्ही खेळाडू ३-३ने बरोबरीत होते. सातव्या आणि निर्णायक गेममध्ये दोघींनीही विजेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावले होते. ६-६ अशा बरोबरीनंतर सुहानाने आक्रमक खेळ केला. यामुळे सलग ५ मॅच पॉर्इंट मिळवित तिने विजेतेपदाला गवसणी घातली.मिझोराममध्ये मागील वर्षी झालेल्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत पृथोन कांस्यपदक मिळविले होते. मॉडर्न स्कूलमध्ये सहावीत शिकणारी पृथा ही रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
राष्ट्रीय मानांकन स्पर्धेतही पुण्याच्या पृथाचा ठसा
By admin | Updated: June 26, 2017 03:59 IST