शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

हवेलीत पुन्हा अवैध वाळूउपसा

By admin | Updated: July 27, 2015 04:02 IST

वरुणराजाची गैरहजेरी तसेच महसूल व पोलीस यंत्रणा ग्रामपंचायत निवडणूक कामांत दंग झाल्याचा मोका साधून हवेली तालुक्यातील वाळूमाफियांनी

लोणी काळभोर : वरुणराजाची गैरहजेरी तसेच महसूल व पोलीस यंत्रणा ग्रामपंचायत निवडणूक कामांत दंग झाल्याचा मोका साधून हवेली तालुक्यातील वाळूमाफियांनी अवैध वाळू उपसा व अनधिकृत वाळू वाहतूक राजरोसपणे सुरू ठेवली आहे. इतर गौणखनिज उत्खननही तालुक्याच्या काही भागांतून मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. कारवाईचा धसका काही प्रमाणात अवैध गौणखनिज उत्खनन करणारे व वाहतूक करणाऱ्यांनी घेतला होता. परंतु महसूल व पोलीस विभागाची सर्व यंत्रणा सहा आॅगस्टपर्यंत ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत गुंतली असल्यामुळे खुलेआमपणे अवैध वाळू वाहतूक व गौणखनिज उत्खनन होत आहे. एकट्या हवेली तालुक्यातून गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांवर कारवाई करीत सुमारे वीस लाखांहून अधिकचा दंड महसूल विभागाने जमा केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यामध्ये अनेकदा वाळू वाहतूकदारांकडे बोगस चलने आढळल्याने वाळूमाफियांची या व्यवसायातील खोलवर रुजलेली मक्तेदारी स्पष्ट झाली होती.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश २०१५ चे कलम ४८ (७) बाबत व अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतुकीबाबत जिल्हाधिकारी खनिकर्म विभागाने एक परिपत्रक जारी केले असून यामध्ये पाचपट दंडाची रक्कम आकारण्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.अशा प्रकारे पाचपट दंडाची रक्कम आकारण्याचे स्पष्ट निर्देश महसूल विभागाला प्राप्त झाले आहेत. या आदेशानुसार वाळूमाफियाचे धाबे दणाणले आहे. परंतु या आदेशावर निवडणूक निकाल लागल्यानंतरच अंमलबजावणी होणार असल्याने सध्या तरी वाळूमाफियाचे फावले आहे. त्यामुळे ते राजरोसपणे खुलेआम वाहतूक करताना दिसत आहेत.