याबाबत माहिती अशी की, शेतकरी विनोद पिलाणे यांचे राहूनजीक सहकारनगर येथे शेतीक्षेत्र असून शेतजमिनीतून दोनशेहून अधिक ब्रास परस्पर मुरूमाचा उपसा करण्यात आला आहे.वेळोवेळी संबंधित लोकांना जाब विचारला असता अरेरावी, दहशतीची भाषा केली जात असल्याचे पिलाणे यांनी सांगितले. यासंदर्भात राहू येथील मंडलाधिकारी विनोद धांडोरे यांनी सांगितले की, मुरूम उपसा करणाऱ्याला यापूर्वी चार लाख रुपयांचा दंड करण्यात आला असून पिलाणे यांच्या क्षेत्रातील पंचनामा करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.संबंधित लोकांच्याकडून माझ्या शेतीमध्ये बेकायदेशीररीत्या मुरूम उपसा करुन शेतजमिनीची हानी करण्यात आली असून लवकरात लवकर महसूल विभागाने यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी विनोद पिलाणे यांनी दिला आहे.
---