शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामांचे जंजाळ

By admin | Updated: August 1, 2014 05:17 IST

शहराच्या चारही बाजूला डोंगर व टेकड्या आहेत. या डोंगरउतारावर धोकादायकरीत्या बेकायदेशीर झोपडपट्टी व वसाहती उभारण्यात आल्या आहेत

पुणे : शहराच्या चारही बाजूला डोंगर व टेकड्या आहेत. या डोंगरउतारावर धोकादायकरीत्या बेकायदेशीर झोपडपट्टी व वसाहती उभारण्यात आल्या आहेत. बिबवेवाडीत बुधवारी व येरवड्यात गुरुवारी दरड कोसळली. त्याचा सर्वाधिक धोका कात्रज परिसरातील डोंगरउतारावरील वसाहतींना आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग येते. आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर डोंगर कोसळला. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बांधकाम विभागाचे प्रमुख व नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना डोंगर व टेकड्यांच्या उतारावरील धोकादायक स्थितीतील वसाहती, झोपड्या व घरांचे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथकाद्वारे थेट वसाहतीमध्ये जाऊन नागरिकांना दक्षतेचा इशारा देताना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले जात आहे. शहराचे दक्षिण टोक असलेल्या कात्रज परिसरातील डोंगराच्या उताराला आगम मंदिर परिसरात अनेक घरे आहेत. त्यानंतर दरी पूल भागातही मोठ्या प्रमाणात डोंगरउतारावर बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत. तर कात्रजच्या डोंगराच्या रांगेतील अनेक टेकड्या फोडून सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात धोका वाढत चालला आहे. परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. बिबवेवाडी येथील यश लॉनकडे जाण्यासाठी टेकडी फोडून मेघस्पर्श सोसायटीसमोरचा रस्ता करण्यात आला आहे. त्या ठिकाणी बुधवारी दरड कोसळली. जिवीतहानी झाली नाही. त्यानंतर रामनगरमध्ये गुरुवारी दरड कोसळली आहे. त्या पार्श्वभूमीवर डोंगर व टेकड्यांच्या उतारावरील वसाहतीच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)