शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट डिग्री तपासाकडे पोलिसांकडून होतेय दुर्लक्ष

By admin | Updated: September 12, 2014 03:20 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बनावट गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्रके तयार करणाऱ्या तब्बल १०६ विद्यार्थ्यांच्या विरोधात विद्यापीठाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बनावट गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्रके तयार करणाऱ्या तब्बल १०६ विद्यार्थ्यांच्या विरोधात विद्यापीठाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. परंतु, पोलिसांकडून त्यातील एकाही आरोपीवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातच नाही, तर परदेशातही नोकरी मिळविण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर राजरोसपणे करीत आहेत. पोलिसांनी या रॅकेटचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई केली, तर विद्यार्थीसुद्धा गैरमार्गाला जाण्यापूर्वी हजारवेळा विचार करतील. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी विद्यापीठाकडून केली जात आहे.विद्यापीठाशी संलग्न मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयात संकेत नाईकरे या विद्यार्थ्याने प्रथम व द्वितीय वर्षाच्या बनावट गुणपत्रिका सादर केल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. गजानन खराटे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात संबंधित विद्यार्थ्याने बनावट गुणपत्रिका तयार करून, ती महाविद्यालयात सादर केली होती, अशी माहिती समोर आली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संकेत नाईकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे पत्र दिले होते. नाईकरे या विद्यार्थ्याने सादर केलेल्या बनावट गुणपत्रिकेबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे या प्रकरणातील तपासातून बाहेर येऊ शकली असती. परंतु, सहा महिन्यांहून अधिक काळ उलटला तरीही पोलिसांनी या दृष्टीने कोणताही तपास केला नाही.सिंगापूर कौंसिलेटकडून पुणे विद्यापीठाकडे काही पदवी प्रमाणपत्रे तपासणीसाठी आली होती. या प्रमाणपत्रांची तपासणी करून, त्यातील ५० प्रमाणपत्रे बनावट असल्याचे विद्यापीठाने शोधले होते. परंतु, सिंगापूरसह इतर १०६ पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रके बनावट असून, या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करावा, अशा तक्रारीही विद्यापीठाने पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दिल्या आहेत. परंतु, पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहिलेले दिसून येत नाही. (प्रतिनिधी)