शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

..मी मतदान करणार...तुम्ही!

By admin | Updated: October 13, 2014 00:35 IST

मतदानाचा टक्का वाढावा, या साठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, नागरिकांकडून मतदानाचा संकल्प सोडण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे

पुणे : मतदानाचा टक्का वाढावा, या साठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, नागरिकांकडून मतदानाचा संकल्प सोडण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना संकल्पपत्राचे वाटप करण्यात येत असून, त्या माध्यमातून पालक मतदारांशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मतदानादिवशी सुट्टी असल्याने अनेक मतदार मतदानाचे कर्तव्य बजावण्याऐवजी सहलीची मजा लुटतात. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य बजावावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत मतदाररथ तयार करण्यात आला असून, नागरिकांना मतदानासाठी आवाहन करण्यात येत आहे. यंदाच्या निवडणुकीत ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही मतदारांपर्यंत पोचण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना संकल्प पत्राचे वाटप करण्यात येत असून, विद्यार्थी पालकांकडून ‘मी मतदान करणार’ असा संकल्प लिहून घेणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या जनजागृती मोहिमे अंतर्गत गावातील बाजार पेठ, रेल्वे स्टेशन, बस थांबे या ठिकाणी फ्लेक्स उभारण्यात आले आहेत. महाविद्यालय, कॉलेजमध्ये युवकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने पथनाट्याद्वारे मतदान करा असे आवाहन करण्यात येत आहे. रेडिओ आणि टिव्हीवर जाहिराती देखील करण्यात आल्या आहेत. या शिवाय महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध महिला संघटना, स्वयंसेवी सघटना व महिला बचत गटांशी संपर्क साधण्यात येत आहे. ‘मताची किंमत नाही घेणार, मत मात्र जरुर देणार’, जो दारु-साड्या-नोटा वाटणार मता पासून दूर ठेवणार अशा उद््घोषणाच्या माध्यमातून मतदारांना योग्य व्यक्तीलाच मतदान करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)