शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांसाठी धांदल

By admin | Updated: June 9, 2016 01:59 IST

प्रवेशप्रक्रियेत मुख्यत्वेकरून कागदपत्रे महत्त्वाची असतात.

पिंपरी : प्रवेशप्रक्रियेत मुख्यत्वेकरून कागदपत्रे महत्त्वाची असतात. याच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रे व तहसील कार्यालय गर्दीने भरली आहेत. त्यामध्ये जातीचा दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रिमीलेअरची जुळवाजुळव करण्यासाठी पालकांचीही धांदल उडाली आहे. त्यातच नागरी सुविधा केंद्रचालकांचेही तहसील कार्यालयात हेलपाटे सुरू आहेत. दिवसाला साधारणत: ५०० नागरिक दाखल्यासाठी नोंदणी करीत आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयातही दाखले वेळेत कसे मिळतील, यावर भर दिला आहे. प्रवेशप्रक्रियेच्या कालावधीतच कागदपत्रे मिळविण्यासाठी आवश्यक असल्याने जास्त पैसे भरण्याची तयारीही काही पालकांनी दर्शविली आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांनी दहावी प्रवेशानंतर प्रथमच कागदपत्रांची जुळवाजुळव करत असल्याने, तसेच पालकांना माहिती अपुरी असल्याने धांदल उडत आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात चौकशी विभाग स्वतंत्र असणे आवश्यक आहे. कारण, बहुधा कित्येक नागरिकांना याबद्दल हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे. तहसील कार्यालयात कागदपत्रांसाठी रांगा लागल्या आहेत. वेळेतच कागदपत्रे कशी मिळतील, यासाठी पालकांची शर्यत लागली आहे. काही पालकांनी कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी कामावरून सुट्या टाकल्या आहेत, तर काही पालक ठरलेल्या वेळेत कागदपत्रे तयार करून मिळत नसल्याने संताप व्यक्त करीत आहे. उत्पन्नाचा व रहिवासी दाखला सात दिवसांच्या आत मिळणे बंधनकारक आहे, तर जात प्रमाणपत्र हे १५ दिवसांच्या आत मिळणे आवश्यक आहे. यासाठी पालकांचा खटाटोप सुरू आहे. मात्र, तहसील कार्यालयात यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. नायब तहसीलदार ज्योती जाधव व काही कर्मचाऱ्यांच्या टेबलाभोवती नागरिक गराडा घालून बसले आहेत, तर काही नागरिक कागदपत्रे वेळेत पूर्तता करूनही मिळत नसल्याने नायब तहसीलदार यांच्याकडे विनवण्या करीत आहेत. मात्र, तहसील कार्यालयात कागदपत्रे पाहणीसाठी कर्मचाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडत आहे. (प्रतिनिधी)>तहसीलदार : वीस हजार दाखले देणारकागदपत्रे वेळेत देण्यावर आमचा भर आहे. पालकांच्या माहितीसाठी फलक लावलेले आहेत. तसेच काही पालकांना कागदपत्रांबद्दल काहीच माहिती नसल्याने पालकांना अडचण निर्माण होत आहे. अंदाजे १५ ते २० हजार दाखले तीन महिन्यांत द्यायचे आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांना कामाचे नियोजन करून दिले आहे, अशी माहिती हवेलीचे तहसीलदार किरणकुमार काकडे यांनी सांगितली.विद्यार्थ्यांना तातडीने दाखले हवे आहेत. ही गरज ओळखून दाखले लवकर मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये एजंटचाही मोठ्याप्रमाणात वावर आहे. परंतु या कार्यालयातच दोन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने छापा टाकून कारवाई केली आहे. त्यामुळे हे एजंट खुलेआमपणे काम न करता लपूनछपून काम करत आहेत.