शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

केडगावला शेकडो बांधकामे अनधिकृत

By admin | Updated: December 17, 2014 05:35 IST

केडगाव (ता. दौंड) येथे शेकडो अनधिकृत बांधकामे झाल्याने या बांधकामांमुळे स्थानिक प्रशासनाची अडचण झाली आहे.

केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथे शेकडो अनधिकृत बांधकामे झाल्याने या बांधकामांमुळे स्थानिक प्रशासनाची अडचण झाली आहे. एकाच वेळी येथे जवळपास १०० बांधकामे चालू आहेत. त्यापैकी गेल्या १० वर्षांत काही पूर्ण तर काही अपूर्णावस्थेत आहेत. ही बांधकामे करताना बांधकाम व्यावसायिकांनी टाऊन प्लॅनिंगप्रमाणे काम न केल्यामुळे या बांधकामांना पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही. यामुळे ग्रामपंचायतीचा जवळपास ७५ लाख रुपयांचा महसूल बुडत आहे़ त्याचा परिणाम परिसराला सोयीसुविधा देण्यात अडचणी येत आहे़ काही ठिकाणची कामे पूर्ण झाली असून, या ठिकाणी हजारो रहिवासी राहतात. विशेष म्हणजे ही बांधकामे अनधिकृत असल्याने ग्रामपंचायतीला नोंदी करता येत नाहीत. या सदनिकाधारकांना तसेच चालू असणाऱ्या कामांना प्रशासनाकडून पाणी, वीज, स्वच्छता यांसारख्या सुविधा दिल्या जात आहेत. मात्र, नोंदी नसल्याने येथील फ्लॅटधारक ग्रामपंचायतीचा कर भरत नाहीत. सध्या ग्रामपंचायतीला करस्वरूपात २४ लाख रुपयांचा महसूल मिळतो. गावातील सर्व बांधकामे प्रशासनाने अधिकृत करून त्यांच्या नोंदी केल्यास ग्रामपंचायतीचा महसूल १ कोटीपर्यंत जाऊ शकतो. हा महसूल मिळत नसल्याने सोयीसुविधा देण्यास ग्रामपंचायतीला मर्यादा येत आहेत़ सध्या केडगाव-वाखारी रस्त्यावर अनेक बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामे सुरू केली आहेत़ हा रस्ता ५० फूट रुंद असून, सध्या तो अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. मात्र, त्याची प्रशासनाच्या पातळीवर कोणीही दखल घेत असल्याचे दिसून येत नाही़(वार्ताहर)