शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कटकेवाडीतील खासगी कंपनीच्या गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:11 IST

वाघोली : कटकेवाडी फाटा परिसरामध्ये असलेल्या सिस्का कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी (दि. २३) सायंकाळी उशिरा उघडकीस ...

वाघोली : कटकेवाडी फाटा परिसरामध्ये असलेल्या सिस्का कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी (दि. २३) सायंकाळी उशिरा उघडकीस आली. रात्रभर जळत असलेल्या या गोदामातील लाखो रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, एलईडी जळून खाक झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी पीएमआरडीए अग्निशमन दलाने महापालिका, एमआयडीसी दलाच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले.

सिस्का कंपनीच्या गोदामाला आग लागल्याची माहिती सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाला समजली. तत्काळ आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या. गोदामामध्ये असलेले स्क्रॅप मटेरियल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे आगीने भयंकर रूप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पीएमआरडीएच्या ४ गाड्या, महापालिकेच्या २, एमआयडीसीची १ व अ‍ॅमेनोराची १ अशा आठ गाड्या आग विझविण्यासाठी दाखल झाल्या होत्या.

अग्निशमन दलाच्या गाड्यांना आग विझविण्यासाठी पाणी कमी पडू लागल्याने खाजगी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात आला. रात्रभर गोदामामध्ये आगीचे तांडव व आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते. वाघोली पीएमआरडीए अग्निशमन केंद्रातील उपस्थानक अधिकारी विजय महाजन व त्यांचे पथक तसेच एमआयडीसीचे अधिकारी वैभव तांडेल यांनी पथकाच्या मदतीने सुमारे १२ तास अथक प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. बुधवारी दुपारपर्यंत धुराचे लोट दिसत होते.

फोटो - वाघोली आग नावाने आहे.