शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता ओलांडायचा तरी कसा ?

By admin | Updated: May 1, 2017 03:04 IST

पादचारी रस्त्यावरचा राजा मानले जाते. प्रत्यक्षात हा राजा रोजच जीव मुठीत धरून रस्त्यावर वावरताना दिसतो. शास्रीनगर

चंदननगर : पादचारी रस्त्यावरचा राजा मानले जाते. प्रत्यक्षात हा राजा रोजच जीव मुठीत धरून रस्त्यावर वावरताना दिसतो. शास्रीनगर, रामवाडी, विमाननगर, चंदननगर, खराडी बायपास चौकात पादचाऱ्यांची कुचंबणा होताना दिसत आहे. नगर रस्त्यावरील वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगवरच वाहन थांबवित असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडायचा कोठून, असा प्रश्न नगर रस्त्यावर निर्माण झाला आहे.या गजबजलेल्या रस्त्यांवर नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांकडून अनेकदा कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, काही काळाने परिस्थिती ‘जैसे थे’ होते. या सर्व ठिकाणी वाहतूक पोलीसही फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत.या सर्व चौकांतील सिग्नलवर एका बाजूला झेब्रालाइन पुसट झालेली आहे, तर दुसऱ्या एका बाजूला झेब्रा लाइनच दिसत नाहीय, अशी परिस्थिती नगर रस्त्यावरील सर्व ठिकाणी असल्यामुळे वाहने सर्रास झेब्रालाइनच्या पुढे येऊन थांबतात.रिक्षाचालकांनाही नियमांचे वावडे असल्याचे दिसून येते. सिग्नल तर पाळतच नाही याउलट नियमांचे पालन करणाऱ्यांनाच रिक्षाचालक दमबाजी करतात. (वार्ताहर)2012 साली नगर रस्त्यावर बीआरटी मार्गाचे काम सुरू झाले मात्र, ते काम सुरू झाल्यानंतर नगरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी चौकांतच यावे लागले. आजवर दोनशेंहून अधिक पादचारी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. नगर रस्त्यावर येरवड्यापासून ते खराडी जकात नाक्यापर्यंत शंभरहून अधिक पादचाऱ्यांचे बळी गेले आहेत. नगर रस्त्यावर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सध्या वाहतूक पोलिसांचे संख्याबळ खूपच कमी पडत आहे. येरवड्यापासून ते खराडी जकात नाका तसेच खराडी बायपास ते मुंढवा पुलापर्यंत प्रचंड कोंडी होत आहे आणि ही कोंडी सोडविण्यासाठी सध्या पोलिसांचे संख्याबळ कमी पडत असल्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने यात पादचाऱ्यांना त्यांचा जीव गमवावा लागत आहे.