शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

हॉकर्स झोन निर्माण करणार

By admin | Updated: June 14, 2014 01:47 IST

प्राधिकरणातील पेठ १ ते ४ व ६ मधील मोकळ्या भूखंडांना सीमाभिंत बांधण्याचे ठरले. तसेच विविध क्रीडा सुविधांसाठी पेठ ४, ९ आणि २८ मध्ये क्रीडांगणे तयार करण्यात येणार आहे

पिंपरी : प्राधिकरणाने संपादित केलेल्या मोकळ्या भूखंडांना सीमाभिंत बांधणे, विविध क्रीडा सुविधा देण्यासाठी क्रीडांगणे उभारणे, हॉकर्स झोन व पार्किंग झोन, मॉल, प्राधिकरण बाजार उभारणे, तसेच उड्डाणपुलाच्या वाढीव खर्चास मान्यता देणे अशा विविध विषयांना पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सभेत मान्यता देण्यात आली. २१ कोटी ४७ लाखांच्या प्रकल्पाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.प्राधिकरणाची सभा विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्याधिकारी डॉ. योगेश म्हसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक बी. डी. यमगर, सह शहर अभियंता एम. टी. कांबळे आदी उपस्थित होते. प्राधिकरणातील पेठ १ ते ४ व ६ मधील मोकळ्या भूखंडांना सीमाभिंत बांधण्याचे ठरले. तसेच विविध क्रीडा सुविधांसाठी पेठ ४, ९ आणि २८ मध्ये क्रीडांगणे तयार करण्यात येणार आहे. सेक्टर ४ मध्ये हॉकर्स झोन उभारण्याचा निर्णय झाला. तसेच औंध-रावेत येथील उड्डाणपुलाची लांबी वाढल्याने अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली. प्राधिकरण क्षेत्रातील प्रमुख रस्त्यांवर महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारण्यासाठी अशासकीय संस्थांकडून निविदा मागविण्याचेही ठरले. प्राधिकरण क्षेत्रातील सेक्टर १ व ३९ मध्ये प्राधिकरण बझार बांधण्यात येणार आहे. तसेच सेक्टर ३९ मध्ये क्रीडांगण, वाकडमधील सेक्टर ४० मध्ये पोलीस स्टेशन बांधण्याचाही निर्णय झाला. सेक्टर २९ व ४२ मधील मोकळ्या जागेस सीमाभिंत बांधण्याच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. यासह विविध कामांना मंजुरी दिली. (प्रतिनिधी)