शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भेटीलागी जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आळंदी : भेटीलागी जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी॥ आषाढी पायी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आळंदी : भेटीलागी जीवा लागलीसे आस ।

पाहे रात्रंदिवस वाट तुझी॥

आषाढी पायी सोहळा म्हटलं की वारकरी ऊन, पाऊस, थंडी अन्य कशाचीही तमा न बाळगता माऊलींच्या सोहळ्यात पायी चालतो. कारण पंढरीच्या विठुरायाची त्याला ओढ लागलेली असते. काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घेत नाहीत. निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच. विशेषतः भाविक व स्थानिक आळंदीकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरणारा हा सोहळा असतो. माऊलींच्या आषाढी पायीवारी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होऊन वारीचा आनंद लुटत असतात. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी आषाढी पायीवारी स्थगित करून नियमावलींच्या अधीन राहून बसद्वारे प्रातिनिधिक वारी संपन्न होत आहे. परिणामी या वारीत वारकऱ्यांना, भाविकांना तसेच स्थानिकांना सहभागी होता येत नसल्याने सर्वांना ही वारी दुरूनच अनुभवावी लागत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तब्बल सतरा दिवसांचा आजोळघरातील मुक्काम उरकून आषाढ शुद्ध दशमीला चलपादुकांसह मोजक्या वारकऱ्यांसमवेत सकाळी सव्वानऊच्या सुमारास शिवशाही बसने पंढरीकडे मार्गस्थ झाला. दरम्यान आळंदी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील बहुतांश सर्व रस्ते इतर वाहतुकीसाठी सकाळी सातपासून बंद करण्यात आले होते. नगरपालिका चौक ते वाय जंक्शन या वारीच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करून नागरिकांना रस्त्यावर येण्यास मज्जाव केला होता.

तत्पूर्वी, पालखी प्रस्थान सोहळ्यातील बसमधील माऊलींच्या चलपादुकांचे लांबून का होईना दर्शन घेण्यासाठी तसेच माऊलींना निरोप देण्यासाठी आळंदीकरांनी सकाळपासूनच नगरपालिका चौकातील रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. तर दुतर्फा घऱातून तसेच घरांच्या गॅलरीतून आळंदीकर माउलींच्या दर्शनासाठी उभे होते.

आजोळघरापासून सजविलेल्या बस जुन्या नगरपालिका इमारतीसमोर येताच सर्व उपस्थितांनी माऊली... माऊली... माऊली... नामाचा गजर करत माऊलींच्या पादुकांवर फुलांची उधळण केली. माऊलींचा हा आषाढी सोहळा इंद्रायणीच्या नवीन पुलावरून मार्गस्थ झाल्यानंतर अनेकांनी रस्त्यालाच वाकून माऊलींचे अनोखे दर्शन घेत हात उंचावून सोहळ्याला भावपूर्ण निरोप दिला.

वास्तविक दरवर्षी आळंदीकर माऊलींच्या पायी वारीत सहभागी होऊन कोणी थोरल्या पादुका मंदिरापर्यंत तर कोणी भोसरी फाटा, पुण्यापर्यंत पायी चालत जाऊन सोहळ्याला निरोप देत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनाला तसेच पायी वारीलाही बंदी असल्याने अनेकांना वारीत सहभागी होण्याची इच्छा असूनही दुरूनच वारी अनुभवावी लागली आहे.

चौकट : माऊलींच्या चलपादुका घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसचे (एमएच ०६ बीडब्ल्यू ४३४५) सारथ्य लक्ष्मण पांडुरंग शिरसाठ तर समवेत असलेल्या अन्य एका बसचे (एमएच ०६ बीडब्ल्यू ३६८०) सारथ्य रामचंद्र नामदेव ईघारे यांना करण्याची संधी मिळाली आहे. एसटी सेवेत केलेले प्रामाणिक काम आणि माझी पांडुरंगावर असलेल्या निस्सीम भक्तीचे हे फळ असल्याचे लक्ष्मण शिरसाठ यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

फोटो ओळ : माऊलींच्या दर्शनासाठी तसेच वारी सोहळ्याला निरोप देण्यासाठी जमलेले आळंदीकर. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)

२) आषाढी बसवारी प्रस्थान सोहळ्यानंतर माऊलींच्या मुख्य समाधी मंदिराच्या कलशावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

३) शिवशाही बसमध्ये सजविलेल्या खुर्चीवर स्थानापन्न केलेल्या माऊलींच्या चलपादुका.

४) पंढरीला आषाढी वारी घेऊन जाणारी शिवशाही बस.

(सर्व छायाचित्रे : भानुदास पऱ्हाड)