शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये सुरू होता हुक्का बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विमाननगर येथील हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेने छापा टाकून हॉटेलमालकासह तिघांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : विमाननगर येथील हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेने छापा टाकून हॉटेलमालकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

हॉटेल तलबचे मालक सचिन अशोक रणपिसे (वय ३०, रा. येरवडा), अमर संतोष गायकवाड (वय २६, रा. येरवडा) व हॉटेल मॅनेजर दिलीपकुमार मांगीलाल मालविया (वय २६, रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण आणि अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना वरिष्ठ अधिकाऱ्र्यांकडून विमाननगर येथील हॉटेल तलब येथे हुक्का बार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहक पाठविण्यात आले

त्यानंतर पोलिसांनी छापा मारला. त्यात हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का बार चालवून ग्राहकांना हुक्का सेवनासाठी पुरवित असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वेगवेगळे हुक्का फ्लेवर्स, ११ हुक्का पॉट,चिलीम पाईप व दोन मोटरसायकली असा २ लाख ३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.