पिंपरी-चिंचवड बँकचे सीईओ किरण पटोळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलिमा पवार, रोटरी क्लब अध्यक्ष दीपक लोंढे उपस्थित होते.
कोरोना योद्धांनी कोरोनाच्या संचारबंदीत सलग नऊ महिने गरीब, अनाथ, परप्रांतीय, ज्येष्ठ नागरिक, वसतिगृह विद्यार्थी, भिक्षेकरी यांना दररोज जेवण, औषधे, कपडे उपलब्ध करून दिले आहेत. तसेच राहण्याची आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्वतःच्या जीवाची आणि कुटुंबाची परवा न करता ह्या सेवेत झोकून दिले. म्हणून यांना कोरोना योद्धा सन्मान देऊन गौरविले.