शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीबाधित मातेचे बाळ होणार ‘एड्समुक्त’

By admin | Updated: May 27, 2014 07:09 IST

चआयव्ही एड्सबाधित मातेकडून बाळाला या रोगाची लागण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या वतीने राज्यात पीपीटीसीटी औषधप्रणाली राबविण्यात येत आहे

बारामती : एचआयव्ही एड्सबाधित मातेकडून बाळाला या रोगाची लागण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या वतीने राज्यात पीपीटीसीटी औषधप्रणाली राबविण्यात येत आहे, त्यामुळे जन्माला येणारे बाळ ‘एचआयव्ही एड्समुक्त’ असेल, त्यासाठी या आधुनिक औषध प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी एचआयव्हीबाधित मातेकडून बाळाला या रोगाची लागण होऊ नये, यासाठी प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर असे दोन वेळा ‘नेव्हीरॅपीन’ औषधाचा डोस दिला जात होता, त्याचाही चांगला परिणाम झाला. जन्माला येणार्‍या बाळाला एड्समुक्त करण्यात यश आले. तरीही कोणताही धोका नको म्हणून पीपीटीसीटी ‘आॅप्शन बी’ या औषध प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कोणत्याही गरोदर मातेला आयसीटीसीमध्ये पहिल्यांदाच एचआयव्हीबाधित म्हणून नोंदविल्यास सीडी ४ ची वाट न पाहता विनाविलंब टीएलई या औषधांची सुरुवात एआरटी केंद्रातून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. दुसर्‍यांदा प्रसूतीसाठी आलेल्या एचआयव्ही मातेला टीएलएलटीव्ही या औषधांची मात्रा सुरू करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. एचआयव्ही बाधित मातेकडून जन्माला आलेल्या बालकाला नेव्हीरॅपीन औषध जन्मापासून सहा आठवड्यांपर्यंत द्यायचे आहे. मातेकडून बाळाला अंगावरचे दूध पाजले जात असो अथवा नसो तरीही या औषधाचा वापर बाळासाठी करण्यात येत आहे. ज्या गरोदर माता आरोग्यकेंद्रात अचानक प्रसूतीसाठी येतात. ज्यांची रक्तनमुने चाचणी एचआयव्हीबाधित आहे, अशा गरोदर मातांना विनाविलंब या औषधांचा वापर करावा. त्याची नोंद एआरटी केंद्रात तातडीने करावी, असेही या औषध प्रणालीनुसार सुचविण्यात आले आहे, त्यामुळे एड्सबाधित मातांकडून जन्माला येणारे बाळ एड्समुक्त ठेवण्यावर भर दिला आहे. त्यात राज्य एड्स नियंत्रण सोसायटीला यश आले आहे. (प्रतिनिधी)