शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

ऐतिहासिक परंपरा पुस्तकरुपात

By admin | Updated: December 20, 2014 23:45 IST

पर्यटन क्षेत्राशी संबंधित अद्ययावत माहिती दर्शविणारे तसेच शहराच्या ऐतिहासिक परंपरेची माहिती देणारे कॉफीटेबल बुक तयार काण्यात येणार आहे.

पुणे : शहरातील पर्यटन व्यावसायाला चालना देण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळ आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित अद्ययावत माहिती दर्शविणारे तसेच शहराच्या ऐतिहासिक परंपरेची माहिती देणारे कॉफीटेबल बुक तयार काण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यांत हे पुस्तक तयार करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली. ऐतिहासिक शहर असलेल्या पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरातत्त्व वास्तू आहेत. यासोबतच प्राचीन मंदिरे आणि गडकोट अनेक आहेत. शहरातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील पर्यटनस्थळांची सचित्र माहिती जगभरातील पर्यटकांना मिळावी यासाठी वेबसाईट सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अनेकदा महापालिकेत विविध देशांमधील राजकीय तसेच प्रशासकीय प्रतिनिधी भेट देतात. तर महापालिकेचे पदाधिकारीही परदेशातील शहरांना भेट देतात. अशा वेळी त्या ठिकाणी महापालिकेची माहिती पुस्तकस्वरूपात उपलब्ध करून दिल्यास ती कायमस्वरूपी त्यांच्याजवळ उपलब्ध राहील तसेच शहराची माहितीही एकाच पुस्तकात उपलब्ध होईल या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे धनकवडे म्हणाले. त(प्रतिनिधी)च्या पुस्तकात ऐतिहासिक पुण्यापासून आतापर्यंतच्या पुण्याची वाटचाल चित्रबद्ध आणि शब्दबद्ध स्वरूपात असणार आहे. त्यासाठीचे काम जाणकार पुणेकरांना सोबत घेऊन त्यांच्यामार्फत तज्ज्ञांच्या समितीतून हे पुस्तक साकारले जाणार आहे. च्हे पुस्तक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार असून, त्यात पुणे शहराने विविध क्षेत्रांत केलेली प्रगती आणि शहरास मिळालेली नवनवीन ओळख याचाही समावेश असणार असल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले.