शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मोक्का कारवाईविरोधात गुंड सचिन पोटेला उच्च न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुंढवा भागातील एका पबमध्ये गोळीबार केल्याप्रकरणात पोलिसांनी गुंड सचिन पोटेसह त्याच्या १० साथीदारांवर महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मुंढवा भागातील एका पबमध्ये गोळीबार केल्याप्रकरणात पोलिसांनी गुंड सचिन पोटेसह त्याच्या १० साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने गुंड सचिन पोटे याला दिलासा दिला असून ३० एप्रिलपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंढवा येथील टिकी लाऊंज पबमध्ये जून २०१८ मध्ये तक्रारदार यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. तेथे निलेश चव्हाण व त्याचे साथीदार आले होते. तेथे सचिन पोटे, अजय शिंदे व त्याचे साथीदार आले होते. निलेश चव्हाण याच्या नावाने वारंवार अनाऊंसमेट झाल्याने सचिन पोटे व निलेश चव्हाण यांच्यात वाद झाला. तेव्हा सचिन पोटे याने आपल्याकडील पिस्तुलातून निलेश चव्हाण याच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. पोटे याच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये तोडफोड करुन सीसीटीव्हीचा डीव्हीआर जबरदस्तीने घेऊन गेले होते. याप्रकरणी तेव्हा केवळ हॉटेलमधील तोडफोडीबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. नुकतेच याप्रकरणी फिर्यादीने आता गोळीबाराची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सचिन पोटेसह १० जणांवर मोक्का कारवाई केली होती. सचिन पोटे सध्या फरारी आहे.

मोक्का कारवाईविरोधात ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांच्यामार्फत सचिन पोटे याने उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. हा प्रकार २०१८ मधील असून तेव्हा फिर्यादीने केवळ हॉटेलमध्ये तोडफोड झाल्याची तक्रार दिली होती. आता पोलिसांच्या सांगण्यावरुन फिर्यादीने ४ मार्च २०२१ रोजी गोळीबारची तक्रार दिली असल्याचे अ‍ॅड. पोंडा यांनी सांगितले. न्यायालयाने याबाबत पोलिसांना त्यांंचे म्हणणे मांडण्यास सांगितले असून तोपर्यंत आरोपीवर कोणतीही कठोर कारवाई करु नये, असा आदेश दिला आहे. पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी होणार असून तोपर्यंत तपास अधिकार्‍यांना तपासात संपूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिला आहे.

आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आबाद पोंडा, अ‍ॅड. विपुल दुशिंग, अ‍ॅड. तेजस पुणेकर यांनी काम पाहिले.