शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वारसास्थळे दुर्लक्षितच

By admin | Updated: April 19, 2016 01:03 IST

वारसास्थळांच्या सुरक्षिततेकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही. वर्षातून एकदा वारसादिन साजरा करणे आणि त्यात समाधान मानणे ही वृत्ती चुकीची आहे.

वारसास्थळांच्या सुरक्षेबाबत काय वाटते? - वारसास्थळांच्या सुरक्षिततेकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही. वर्षातून एकदा वारसादिन साजरा करणे आणि त्यात समाधान मानणे ही वृत्ती चुकीची आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर वारसास्थळांकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष करत आहोत, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. प्रत्येकच महत्त्वाच्या स्थळाला वारश्याचा दर्जा मिळतो, असे नाही. मात्र, आपल्या राज्यात जी निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित वारसास्थळे आहेत त्यांचे रक्षण करणे हे समाजाचे आणि शासनाचे काम आहे. ते योग्य पद्धतीने व्हायला हवे. या सर्व कामासाठी शासन पुरे पडेल, असे नाही. त्यामुळे स्थानिकांनी यासाठी पुढाकार घेऊन या वास्तू जपायला हव्यात. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तूंबाबत काय वाटते? - महाराष्ट्रात सिंधुदुर्गसारखा सागरी किल्ला, समुद्रातील अष्टपैलू हिरा म्हणावा असा जंजिरा किल्ला आहे. शिवरायांचा पराक्रम दुमदुमत ठेवणारे राजगड, रायगडसारखे गड आहेत. याबरोबरच नाशिकजवळ थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री असलेल्या गोपिकाबार्इंचा वाडा, तर कोपरगाव येथे आनंदीबार्इंचा असलेला वाडा या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वास्तू आहेत. पुण्यातही नाना वाडा, विश्रामबाग वाडा, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू अशा क्रांतिकारकांची घरे आहेत. त्याकडे लक्ष देण्याचे कर्तव्य कोणाचे? राज्यातील वारसा असलेल्या कोणत्या वास्तू दुर्लक्षित आहेत?- महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक तालुक्यात कलासंपन्न असे मंदिर आहे. वास्तुरचनेच्या दृष्टीने एकमेव अशीही अनेक मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे आज अखेरचा श्वास घेत आहेत. काही दुर्मिळ मूर्ती भग्नावस्थेत आणि दुलर्क्षित आहेत. हा वारसा जपणे आपले काम आहे. परभणीतील धारासुर येथील बाराव्या शतकातील घडीव विटांचे शिखर असलेल्या मंदिरात विष्णूच्या केशवादी २४ मूर्ती आहेत. याकडे शासन आणि समाज कोणाचेच लक्ष नाही. बीड जिल्ह्यातील धर्मपुरी येथेही केदारेश्वरचे उत्कृष्ट शिल्पाकृती असलेले मंदिर आहे. विदर्भातही ब्रह्मा, विष्णू, सूर्य, शीव असे एकत्रित असलेल्या अनेक मूर्ती आहेत. आपल्याकडील नाही, मात्र परदेशातील अभ्यासक याचा अभ्यास करताना दिसतात. कोणती काळजी घ्यायला हवी?- अनेक अद्वितीय अशा मूर्ती आता कमी झाल्याचे दिसते. या मूर्तींची तस्करी होऊ नये यासाठी प्रत्येकाने जागरुक असायला हवे. असे न झाल्यास आपल्याच वारशाचा अभ्यास आपल्याला परदेशात जाऊन करावा लागेल आणि येत्या काही दिवसांतच हे होईल. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे शासन व समाज यांनी वारसा संभाळायची, त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात अनेक वारसास्थळे असून, त्याची योग्य पद्धतीने देखभाल होत नसल्याची भावना मूर्ती शास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ऐतिहासिक मूर्तींची तस्करी होऊन त्या परदेशात जाण्याचे प्रमाण मोठे असून, भारतातून ही तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. वर्षाला होणाऱ्या तस्करीतून कित्येक हजार कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक ठेवा असून, त्याची आपण योग्य ती काळजी घेत नसल्याने तो आपल्याकडून दुसरीकडे जात आहे. त्यामुळे विशिष्ट भागातील स्थानिक आणि शासनाने याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.