शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

असाध्य आजारावरील उपचारासाठी मदत

By admin | Updated: May 30, 2016 01:18 IST

असाध्य आजारांवर महापौर निधीतून २५ ते ५० हजार रुपयांची मदत उपलब्ध होणार आहे.

पुणे : कॅन्सर, किडनीरोपण, हृदयशस्त्रक्रिया, एन्जोप्लास्टी, दृष्टीपटल दोष अशा असाध्य आजारांवर महापौर निधीतून २५ ते ५० हजार रुपयांची मदत उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला असून, येत्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.असाध्य आजारांवर उपचारासाठी यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार आरोग्य विभागाच्या वतीने हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. या अंतर्गत रुग्णांना किडनीरोपणसाठी प्रत्येकी २५ हजार, कॅन्सरसाठी ५० हजार,र् ैहृदयविकार (बायपास) शस्त्रक्रियेसाठी ३० हजार, एन्जोप्लास्टी १५ हजार आणि दृष्टीपटल दोष निवारणासाठी ५० हजार अशी मदत देण्यात येणार आहे. शहरी गरीब योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीसाठी असलेल्या अटी व शर्ती या योजनेसाठीही लागू राहणार आहेत. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पिवळ्या, केशरी रेशनकार्डधारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मदतीचा धनादेश रुग्णांच्या नावे न देता थेट रुग्णालयाच्या नावे दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)या मदतीसाठी महापौर कार्यालयाकडून शिफारस केल्यानंतर आरोग्य विभागाकडून मदत दिली जाणार आहे. मदतीच्या अर्जासोबत त्याबाबतच्या खर्चाचे एस्टीमेट रुग्णांना द्यावे लागणार आहे. महापौर निधीतून दिल्या जाणाऱ्या या मदतीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, त्यापैकी १ कोटी रुपयांचा निधी किडनीरोपणासाठी वापरता येणार आहे. त्यामध्ये प्रत्येकी २५ हजार अशी ४०० रुग्णांना किडनीरोपणासाठी मदत मिळणार आहे. हृदयविकार शस्त्रक्रियेसाठी पावणे दोन कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला असून, त्यामधून ५८३ रुग्णांना प्रत्येकी ३० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. एन्जोप्लास्टीसाठी ५० लाखांचा निधी असून, त्यातून ३३३ रुग्णांना प्रत्येकी १५ हजार रुपये दिले जाणार आहेत. दृष्टीपटलदोषासाठी २५ लाखांची तरतूद असून, त्यामधून ५० रुग्णांना प्रत्येकी ५० हजारांची आर्थिक मदत मिळणार आहे.